चंदुकाका सराफमध्ये सौंदर्य खुलविणारा कर्णफूल महोत्सव वैविध्यपूर्ण आकर्षक कर्णफुलांमुळे होणार परिपूर्ण श्रृंगार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स यांचा प्रत्येक दागिने महोत्सव हा ग्राहकांच्या जिव्हाळ्याचा व कुतुहूलाचा विषय असतो व याची ग्राहक प्रतीक्षा करीत असतात. आता 15 मे पासून चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि.मध्ये अनोखा कर्णफूल महोत्सव साजरा होणार आहे.

गेली 195 वर्षे निरंतर प्रगती करत असलेल्या व ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले बारामतीचे प्रख्यात ज्वेलर्स चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. ज्वेलरी क्षेत्रात आपली गौरवशाली परंपरा जपत अविरत कार्यरत आहेत. चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स यांच्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एकूण 18 प्रशस्त सुवर्ण दालने असून चंदुकाका सराफ वेळोवेळी सुवर्णालंकाराचे नवनवीन आणि वैविध्यपूर्ण कलेक्शन सादर करीत असतात.

सदरचा कर्णफूल महोत्सव चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. यांच्या सर्व शाखांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सोन्याचे आणि डायमंडचे पारंपरिक ते ट्रेंडी, लेटेस्ट डिझाइन्स कानातले दागिने पाहायला व खरेदीसाठी मिळतील. समर ब्लूम कलेक्शन ज्याची थिम आहे. उन्हाळा-वसंत ऋतूंमधील बहराने प्रेरीत होऊन, फुलांच्या पाकळ्यांसारखे नाजूक, नक्षीदार, लोंबते, मनमोहक, लाइटवेट, इंडियन / वेस्टर्न कोणत्याही पेहरावात मॅचिंग आणि स्टायलिश असे वैविध्यपूर्ण कर्णफूलं या महोत्सवात उपलब्ध असणार आहेत, अशी कर्णफूलं ज्यामुळे श्रृंगार परिपूर्ण होणार आहे. सौंदर्य अधिकच खुलविणार्‍या कर्णफुल महोत्सवात सहभागी होण्यासाठी तुमच्या जवळील चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. च्या दालनाला भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 188 Today: 1 Total: 1951367

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *