रोहित मांढरेची आंतरराष्ट्रीय अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवड महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला सत्कार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील आश्वी खुर्द येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित कैलास मांढरे याची दक्षिण विभागातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या नॅशनल यूथ स्पोर्ट्स एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्यावतीने गोवा (मापुसा) येथे घेण्यात आलेल्या 400 मीटर धावणे स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या निवडीबद्दल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबरोबर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शालिनी विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अण्णासाहेब भोसले, निवृत्ती सांगळे, जेहूर शेख, भाऊसाहेब मांढरे, तबादादा मुन्तोडे, शिवाजी मांढरे, भाऊसाहेब मुन्तोडे यांच्यासह डॉ. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, आश्वी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देवीदास दाभाडे, डॉ. सुवर्णा जाधव तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य व सर्व प्राध्यापकांसह आदिंनी अभिनंदन केले आहे.

यापुढील त्याची स्पर्धा दुबई येथे होणार असून महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. प्रमोद विखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या स्पर्धेची जय्यत तयारी केली होती. महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून रोहितने आपल्यातील क्रीडागुणांना जपल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1102671

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *