मंत्री गडाख समर्थकांचा मुळाथडी परिसरात कडकडीत बंद! ठिकठिकाणी चौकसभा होवून निषेधाच्या घोषणा घोषणांनी परिसर दणाणला
नायक वृत्तसेवा, नेवासा
राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय्य सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसांत मंत्री गडाख व पुत्र उदयन यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला आहे, अशा आशयाची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.27) सकाळी 8 वाजल्यापासून मुळाथडी परिसरातील पानेगाव, करजगाव, अंमळनेर, निंभारी, वाटापूर, तामसवाडी, शिरेगाव, खेडलेपरमानंद, बेल्हेकरवाडी, गणेशवाडी आदी गावांत कडकडीत बंद पाळून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी चौकसभा होवून निषेधाच्या घोषणा देत ‘नामदार शंकरराव गडाख तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देवून वातावरण दणाणून सोडले.
यावेळी पानेगावचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामराजे जंगले, सतीश जंगले, मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप, पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, बबन जंगले, कै.पोपटराव संस्थेचे उपाध्यक्ष रमेश गुडधे, हितेश जंगले, करजगावचे आशुतोष माकोणे, चंद्रकांत टेमक, संजय कंक, संदीप पुंड, सतीश फुलसौंदर, ठकाजी बाचकर, अंमळनेरचे सरपंच अच्युत घावटे, एकनाथ पवार, गंगाधर पवार, अण्णासाहेब कंक, निंभारीचे कैलास जाधव, बाबासाहेब पवार, चंद्रकांत जाधव, वाटापूरचे अॅड. पांडुरंग माकोणे, कर्णासाहेब औटी, भिकाजी जगताप, कैलास सुकाळकर, तामसवाडीचे देविदास जगताप, लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत जगताप, शिरेगावचे परमानंद जाधव, किरण जाधव, संदीप जाधव, दिगंबर जाधव, शिवनाथ तुवर, खेडलेपरमानंद मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, सरपंच राजळे, अल्लू इनामदार, बेल्हेकरवाडीचे सरपंच दत्तात्रय बेल्हेकर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंदमध्ये सहभागी झाले होते. सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आदिनाथ मुळे, सतीश कुर्हाडे यांनी चोख बंदोबस्त बजावला.
नामदार शंकरराव गडाख व युवा नेते उदयन गडाख यांच्यावर हल्ला करण्याबाबतची क्लिप व्हायरला झाली. याचा जाहीर निषेध व्यक्त करुन आरोपींना तातडीने अटक करुन घटनेमागचे मुख्य सूत्रधार शोधून काढा.
– संजय जंगले (सरपंच-पानेगाव)
सुसंस्कृत राजकारणाला दिशा देणारे आणि शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी दिवसरात्र काम करणारे राज्याचे सत्ताधारी आणि विरोधक मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या कामाचे कौतुक करत आहे. याचा तालुक्यातील काही विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठत असल्याने एवढ्या खालच्या धराला जावून राजकारण करत आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
– चंद्रकांत जगताप (सरपंच-तामसवाडी)
गेल्या तीन दिवसांपूर्वी नामदार शंकरराव गडाख, उदयन गडाख यांच्यावर हल्ला करण्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. याचा महिला भगिनींच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करुन तातडीने आरोपींना जेरबंद करावे.
– दीपाली नवगिरे (शिवसेना नेत्या)