परिवहन कार्यालय परिसरात बोगस दलालांसह समाजकंटकांना मनाई करा! श्रीरामपूर राज्य परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील राज्य परिवहन कार्यालय परिसरातील बोगस दलाल व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करावी. या मागणीचे निवेदन नुकतेच परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, येथे गैरमार्गाने कार्यरत असलेल्या काही दलालांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांच्या माध्यमातून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खोटे व गैरकायदेशीर काम करून घेण्याकरीता दबाव आणला आहे. यापूर्वी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटक व दलालांवर कायदेशीर करावाई करण्यासाठी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रज्ञा अभंग, पद्माकर पाटील, विकास सूर्यवंशी यांनी फिर्यादी दिल्या आहेत. या प्रकारामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रचंड दहशतीखाली काम करत आहेत. संबंधित समाजकंटक व दलालांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत कार्यालयीन कामकाज निषेध म्हणून बंद ठेवणार आहोत.

दरम्यान, बोगस दलाल व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करावी. अन्यथा सामूहिकरित्या काम बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिला आहे. या निवेदनावर मोटार वाहन निरीक्षक सर्वश्री पद्माकर गो. पाटील, विकास सूर्यवंशी, विनोद घनवट, धर्मराज पाटील, सुनील गोसावी, जयश्री बागुल, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रज्ञा अभंग, श्वेता कुलकर्णी, मयुरी पंचमुख, सुजाता बाळसराफ, अतुल गावडे, धिरजकुमार भामरे, हेमंत निकुंभ, मयूर मोकळ, वरीष्ठ लिपीक हर्षल माळी, दर्शन सोनवणे, अमोल मुंडे, प्रकाश शिलावट, गोकुळ सूळ, अंकुश अंडे, वैभव गावडे, रावसाहेब शिंदे, नरेंद्र इंजापुरी, शंकर काटे, श्रीकांत शिरे, विशाल पाटील, सचिन असमार, सुनील शेवरे, परेश नावरकर, हेमंत नागपुरे आदिंची नावे आहेत.

Visits: 150 Today: 2 Total: 1098247

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *