चंदुकाका सराफतर्फे ‘विंटर वेडिंग्स’ दागिने महोत्सव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिवाळा म्हणजे गुलाबी थंडीचा, आल्हाददायक वातावरणाचा, प्रत्येकाला हवाहवासा गुलाबी ऋतू. हा ऋतू दोन मनांना जवळ आणतो, एकमेकांच्या प्रेमात पाडतो. म्हणून लग्नासाठी ह्यापेक्षा चांगला ऋतू कोणता? हिवाळ्यातील लग्नसोहळा म्हणजे आनंदाची पर्वणीच! हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स ‘विंटर वेडिंग्स’ महोत्सव घेऊन आले आहेत. यामध्ये हिरे व सोन्याच्या दागिन्यांची अप्रतिम श्रेणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
‘विंटर वेडिंग्स’ दागिन्यांच्या श्रेणीमध्ये लग्नाच्या खरेदीला सुरेख दागिन्यांची जोड दिली असून आवडीचे दागिने 65 हजार रुपयांपासून खरेदी करता येणार आहे. विशेषतः अप्रतिम कलाकुसरीचे टेम्पल ज्वेलरी कलेक्शन सादर केले आहे. यात आकर्षक लाईटवेट वैविध्यपूर्ण डिझाईन्सचे दागिने आहेत. पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण ट्रेंडी डिझाईन्सची सांगड असलेले अलौकिक कलेक्शन टेम्पल ज्वेलरी देखील सादर केली आहे. टेम्पल ज्वेलरीमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे भव्य आणि ट्रेंडी कलेक्शन असून लाईटवेट दागिन्यांचे असंख्य प्रकार आहेत. यासोबत अद्वितीय सौंदर्यासाठी डायमंड कलेक्शन आहे. शाही लग्न सोहळ्याकरीता शाही डिझाईन्सचे हिर्याचे दागिनेही 65 हजार रुपयांपासून सुरू आहे. ‘विंटर वेडिंग्स’ अंतर्गत हिर्याचा किंवा सोन्याचा नेकलेस 9 हजार 999 भरून उर्वरित रक्कम मासिक हप्त्याद्वारे भरण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. याबरोबरच विना घट जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिनेही घेऊन जाता येणार आहे. या महोत्सवाचे आयोजन चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि.च्या सर्व शाखांमध्ये 23 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर, 2021 पर्यंत केलेले आहे. त्यासाठी आजच ‘विंटर वेडिंग्स’ श्रेणीतील दागिन्यांची खरेदी करून लग्न सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स प्रा. लि.चे अध्यक्ष किशोरकुमार शहा यांनी केले आहे.