सूर्यतेज संस्थेचा सलग आठव्या वर्षी स्वच्छतेसाठी पुढाकार श्रीराम नवमीनिमित्ताने कोपरगाव-शिर्डी रस्त्यावर दिल्या कचरा पेट्या

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील सूर्यतेज संस्थेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत श्रीराम नवमी उत्सव निमित्ताने कोपरगाव ते शिर्डी रस्त्यावर सलग आठव्या वर्षी भाविकांना खाद्य व पेय पदार्थ वाटप केंद्रावर मोफत कचरापेटी उपलब्ध करून दिली.

सूर्यतेज संस्थेच्या अभियानाला भारत संचार निगम लिमिटेडचे संचालक व ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोरावके, अजित शिंगी, साई गाव पालखीचे मनोज कपोते, सेवानिवृत्त नायब तहसीलदार खिंवराज दुशिंग, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, विद्यार्थीनी, स्वच्छतादूत पथक, महाराष्ट्र हरित सेना यांचे सहकार्य लाभले आहे. स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता जलशक्ती वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात अनेक उपक्रम राबविले आहे. कोपरगाव ते शिर्डी या सोळा किलोमीटर महामार्गावर श्रीराम नवमी उत्सवानिमित विविध ठिकाणच्या अनेक साई पालखी पायी चालून मार्गस्थ होतात. या भाविकांना साईभक्तांकडून श्रध्देने खाद्य व पेय पदार्थ वाटप केले जाते.

या मार्गावर स्वच्छता रथातून तात्पुरत्या स्वरूपाच्या सुमारे 250 कचरा पेटी उपलब्ध करून देवून त्याद्वारे कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मोफत कचरा पेटी वाटप केली आहे. त्यावर आपण सारे साईभक्त साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला पालखी मार्ग स्वच्छ ठेवूया. या संदेशाबरोबर ओला, सुका, प्लास्टिक आणि घातक कचरा वर्गीकरण, उन्हाळ्यात पक्षांना खाद्य आणि पाणी ठेवण्याचे आवाहन, हरित सेना वृक्षसंवर्धन, माझी वसुंधरा अभियान संदेश दिला आहे. या अभियानात संस्थेचेे सदस्य अॅड. महेश भिडे, मिलिंद जोशी, भाऊसाहेब गुडघे, दीपक शिंदे, प्रशांत लकारे, अनंत गोडसे, रवींद्र भगत, अनिल अमृतकर, अतुल कोताडे, अमोल पवार, महेश थोरात, विजय कासलीवाल, राजेंद्र गायधनी, ललीत चौघुले, सतीष सांगळे, विनय कोठावदे, संदीप ठोके, कल्पेश टोरपे सहभागी होते.
