बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद आळेफाटा पोलिसांची पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारवाई

नायक वृत्तसेवा, अकोले
बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या टोळीला अटक करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी अकोले तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले असून रविवारी (ता. 10) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत ही कारवाई करण्यात आली.


याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल फाउंटन समोर वन्य प्राण्यांची कातडे विकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांना गुप्त बातमीदारामार्फात मिळाली. त्यानंतर बडगुजर यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पथकासमवेत या परिसरात सापळा रचला.

हॉटेल समोरील महामार्गालगत मारुती 800 गाडी (एमएच.15, एएच.7963) मध्ये तीन इसम संशयित बसलेले दिसून आले. गाडीजवळ जाऊन खात्री केली असता या तिघांची खात्री पटली. पथकातील पोलीस कर्मचार्‍यांनी एकत्रित छापा टाकला असता त्यांना पकडून नाव व पत्ता विचारला असता साजिद सुलतान मणियार (वय 32, रा. देवठाण), शरद मोहन मधे (वय 32 रा. शेरणखेल) आणि रामनाथ येसू पथवे (वय 49, रा. शेरणखेल, सर्व ता.अकोले, जि. अहमदनगर) अशी सांगितली. गाडीची पाहणी केली असता डिक्कीत बिबट्याची कातडी मिळून आली. पोलिसांनी चारचाकी गाडी आणि एक बिबट्याची कातडी जप्त करत अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, लहानू बांगर, भीमा लोंढे, पोलीस अंमलदार अमित मालुंजे, मोहन आनंदगावकर, पोपट कोकाटे यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार विनोद गायकवाड हे करीत आहे.

Visits: 19 Today: 2 Total: 117609

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *