महाराष्ट्र दिनी माहेश्वरी पुरस्कारांचे वितरण विविध क्षेत्रांतील नऊ मान्यवरांचा होणार गौरव

नायक वृत्तसेवा, राहाता
अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे देण्यात येणारे महेशरत्न, महेशभूषण व महेशगौरव या पुरस्कारांचे वितरण 1 मे, 2022 रोजी सकाळी 10 वाजता माऊली संकुल अहमदनगर येथे संपन्न होणार असल्याची माहिती माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिष मणियार यांनी दिली.

जिल्हा सभेच्या कार्यसमितीची बैठक नुकतीच हॉटेल स्वागत लोणी (ता. राहाता) येथे संपन्न झाली. यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष अनिष मणियार, जिल्हा सचिव अजय जाजू, जिल्हा संघटन मंत्री रामचंद्र राठी, संयुक्त मंत्री सतीशकुमार बाहेती, कैलास बिहाणी, प्रदेश संस्कार समिती प्रमुख गणेशलाल बाहेती, प्रदेश जनसंपर्क मंत्री मनिष मणियार, महेश सेवा निधीचे मानद मंत्री बसंतकाका मणियार, प्रवरा परिसरचे अध्यक्ष अशोक राठी, मंत्री आनंद आसावा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाध्यक्षांनी पुरस्काराची घोषणा केली. सदर पुरस्कार माहेश्वरी महासभेचे महामंत्री संदीप काबरा (जोधपूर) यांच्या हस्ते वितरित होणार असून, माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिसन भन्साळी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील, तर प्रदेश मंत्री मदनलाल मणियार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा यशस्वीतेकरीता अध्यक्ष विनोद मालपाणी, सचिव मुकूंद धूत व त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यात विशेष सामाजिक कार्य करणार्या 3 मान्यवरांना मरणोत्तर महेशरत्न, महेशभूषण पुरस्काराने 1 तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या 9 मान्यवरांना महेशगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याचे माहेश्वरी समाजाचे जिल्हा सचिव अजय जाजू यांनी सांगितले. तरी या पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सभेच्यावतीने कोषाध्यक्ष अनिल भट्टड, उपाध्यक्ष विठ्ठलदास भुतडा, प्रदीप अट्टल, सोमनाथ मुंदडा, महेश बंग, दिलीप बजाज, संयुक्त मंत्री सतीशकुमार बाहेती, रामेश्वर बिहाणी, प्रशांत लढ्ढा, नवनीत दरक, कैलास बिहाणी, संघटन मंत्री रामचंद्र राठी, गणेश बाहेती, दिलीप मुंदडा, मनीष सोमाणी, जितेंद्र झंवर, जिल्हा महिला संघटनच्या अध्यक्षा वासंती भट्टड, सचिव अनुराधा राठी, युवा संघटनचे अध्यक्ष सागर राठी, सचिव ओंकार इंदाणी आदिंनी केले आहे.

पुरस्कार निवड समिती सदस्य मधुसूदन सारडा, अविनाश मंत्री, प्रा. ओंकारनाथ राठ यांनी पारदर्शी परीक्षण करून जाहीर केलेले पुरस्कारार्थी महेशरत्न – स्व. डॉ. राजेंद्र मालपाणी, स्व. नंदकिशोर सारडा, स्व. निर्मला मालपाणी, महेशभूषण – रामसुख (आर.डी.) मंत्री, महेशगौरव – डॉ. सुभाष मुंदडा (वैद्यकीय), भरत झंवर (क्रीडा), अतुल डागा (सामाजिक), शकुंतला सारडा (कला), कल्याण कासट (उद्योग), श्रीनिवास सोमाणी (कृषी), प्रा. डॉ. विजयकुमार राठी (शैक्षणिक), तर विशेष सन्मान पुरस्कार हा रामनाथ व दीपाली बंग यांना विभागून जाहीर झाला आहे.
