जिल्ह्यात शुक्रवारपासून सिरो सर्वे

नायक वृत्तसेवा, नगर
नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी अॅण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी आजपासून (25 जून) अहमदनगर जिल्ह्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्यावतीने सिरो सर्वे केला जाणार आहे. यामध्ये यावेळी मुलांचाही प्रथमच समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सिरो सर्वेलन्स अधिकारी डॉ. चेतन खाडे यांनी दिली.

यापूर्वी जिल्ह्यात तीन वेळा सिरा ेसर्वे करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये लहान मुलांचा समावेश नव्हता. आता संभाव्य तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याशिवाय दुसर्या लाटेत मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याचे अहमदनगर जिल्ह्यातून पुढे आले होते. त्यामुळे यावेळी या सर्वेमध्ये मुलांचाही समावेश करण्यात आला आहे. सहा ते 17 वर्षे वयोगट आणि अठरा ते त्यापुढील वयाच्या व्यक्ती यांची तपासणी करून त्यांच्यामध्ये अॅण्डीबॉडीज विकसित झाल्यात किंवा कसे याचा अभ्यास केला जाणार आहे. जिल्ह्यातील विविध गावातील आणि विविध वयोगटातील 400 जणांची चाचणी यासाठी केली जाणार आहे.
