…तर मुश्रीफ यांच्यासमोर हनुमान चालिसा लावणार! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा; मोफत भोंगेही वाटणार

नायक वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे मशिदीवरील आजानचे भोंगे उतरविण्यात यावेत, अन्यथा अहनदनगर दौर्‍यावर येणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे.

बुधवारी (ता.6) पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने हा इशारा दिला आहे. भुतारे यांनी म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोग्यांवर करवाई करावी. अन्यथा मनसे पालकमंत्र्यांच्या दौर्‍यावेळी त्यांच्या गाडीसमोर हनुमान चालिसा लावण्यात येईल. मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी आमची मागणी आहे. सरकार राज्यभर मनसेने लावलेल्या हनुमान चालिसेवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे न्याय हा सर्वांना सारखा असावा. मशिदींवरील भोंग्यावर सरकारने करवाई करणे गरजेचे आहे, असेही भुतारे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांनी हनुमाल चालिसा लावण्यासाठी ठिकठिकाणी मंदिरांना मोफत भोंगे वाटणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘सरकारला अनेकदा विनंती करून सुद्धा बेकायदेशीर भोंगे बंद होत नाहीत. त्यामुळे आता आम्हाला यावर उपाय काढावा लागेल. जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने हनुमान चालिसासाठी भोंगे आम्ही मोफत वाटणार आहोत. ज्यांना भोंगे हवे आहेत, त्यांनी आपल्याकडे संपर्क साधावा’, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Visits: 201 Today: 2 Total: 2121192

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *