शिवरस्ता तात्काळ खुला करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील कारेगाव ते माळीचिंचोरा हा कालव्याजवळील बंद असलेला शिवरस्ता तात्काळ खुला करावा. अन्यथा रांजणगावदेवी भागातील शेतकरी नारायण लक्ष्मण चौधरी यांनी दि.27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता वडाळा बहिरोबा येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी नारायण चौधरी यांनी म्हंटले आहे की, रांजणगावदेवी येथील नऊ ते दहा शेतकर्‍यांनी मिळून 29 सप्टेंबर, 2020 रोजी कारेगाव ग्रामपंचायतसमोर उपोषण केले होते. त्यावेळी आम्हांला वडाळा बहिरोबा येथील मंडलाधिकारी व तलाठी यांनी लेखी आश्वासन देऊन पूर्व-पश्चिम गट क्रमांक 127 व 63 चे पैसे भरा व मोजणी करून घ्यावी असे लेखी दिले होते. त्यानुसार आम्ही चार शेतकर्‍यांनी 50 हजार रुपये मोजणी शुल्क भरले. त्यानंतर मोजणी करुन खुणा देखील करून दिल्या. मात्र त्या शिवाजवळ कालवा आहे. कालवा व शिवरस्त्यामधील अंतर 25 ते 30 फुटाचे आहे. त्यामुळे इतक्या उंचीवरून ऊस वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना कालव्याजवळ पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूने कालव्यालगत रस्ता द्यावा. अन्यथा 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता वडाळा बहिरोबा येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा चौधरी यांनी निवेदनातून दिला आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 116524

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *