तालुक्याने ओलांडली अठ्ठाविसाव्या शतकाची सिमारेषा! राजापूरमधील एकाच्या मृत्युसह आजही पडली चाळीस रुग्णांची भर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड स्थिती दररोज व्यापक होत असून ग्रामीणभागातून रुग्ण समोर येण्याचा सिलसिला आजही टिकून आहे. शहरीभागात कोविड बाधितांची संख्या एक हजारापर्यंत जावून जवळपास थांबेल असा अंदाज शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविला होता, त्यानुसारचे चित्रही समोर दिसू लागले आहे. आजच्या अहवालातूनही असेच काहीसे चित्र समोर आले असून आज खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील अवघ्या पाच जणांसह एकुण 40 जणांचे अहवाल संक्रमित आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या बाधितांनी आज आणखी एका शतकाचा टप्पा ओलांडून तालुक्याला 2 हजार 805 वर नेवून पोहोचवले आहे. त्यासोबतच मंगळवारी रात्री उशीराने ग्रामीण क्षेत्रातील आणखी एकाचा मृत्यु झाल्याने तालुक्यातील मृतांचा आकडाही शासकीय नोंदीनुसार 35 वर गेला आहे.

या महिन्यात कोविडच्या विषाणूंनी संक्रमणाचा वेग धरण्यासोबतच बळींच्या संख्येतही मोठी भर घातली आहे. मंगळवारी सकाळीच बाजारपेठेतील गांधी चौक भागात राहणार्या 70 वर्षीय व्यापार्याचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यानंतर रात्री तालुक्याच्या रुग्णसंख्येत 55 रुग्णांची भर पडून तालुक्याने 28 व्या शतकाच्या दिशेने प्रवास सुरु केला आणि काही वेळातच राजापूरमधील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्युची वार्ता येवून धडकली. त्यामुळे अवघ्या तालुक्यात खळबळ उडाली. दररोजची मोठी रुग्णवाढ आणि त्यातच मृत्युच्या वेदनादायी वार्तांनी हा महिना कोविडचे धक्के देणाराच ठरला आहे.

आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा शहरातील नेहरु चौकातील 26 वर्षीय तरुण, स्वामी समर्थनगर परिसरातील 33 वर्षीय तरुण, गणेशनगर परिसरातील वीस वर्षीय महिला, नवघर गल्लीतील 35 वर्षीय तरुण व जनता नगर मधील चाळीस वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यासोबतच तालुक्यातील आश्वी खुर्द येथील 35 वर्षीय महिला, पेमरेवाडी येथील पंधरा वर्षीय तरुणी, कोठे बुद्रुक येथील 55 वर्षीय इसम, चिंचपूर येथील वीस वर्षीय तरुण, हिवरगाव पठार येथील 85 वर्षीय वयोवृद्ध, तळेगाव दिघे येथील 72 व 50 वर्षीय महिलांसह 46, 19 व 15 वर्षीय तरुण, वडगाव पान मधील 48 वर्षीय महिला,

रायतेवाडी येथील 55 वर्षीय इसमासह 29 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 75 व 57 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द मधील एकूण 70 वर्षीय इसम, सांगवी येथील 60 वर्षीय महिला, लोहारे येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडी येथील 45 व 40 वर्षीय तरुण व 43 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 73 वर्षीय महिला व 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 54 वर्षीय इसम, धांदरफळ बुद्रुक येथील 53 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 26 वर्षीय तरुण, राजापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 38 व 37 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 40 वर्षीय तरुणासह 58 व 38 वर्षीय महिला, कनोली येथील 33 वर्षीय तरुण व निमगाव जाळी येथील 57 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

आजही संगमनेर शहरातून अवघे पाच रुग्ण समोर आले असून ग्रामीण भागातून 35 रुग्ण संक्रमित असल्याचे समजले आहे. आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत 40 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने 28 व्या शतकाची सीमारेषा ओलांडून 2 हजार 805 बाधितसंख्या गाठली आहे. अनधिकृत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत कोविडने तालुक्यातील 41 जणांचा बळी घेतला आहे. तर शासकीय नोंदीनुसार आज अखेर पस्तीस जणांचे जीव गेले आहेत. मंगळवारी रात्री उशिराने राजापूर येथील 78 वर्षीय इसमाचा खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर व्यक्ती शिक्षक असल्याने त्यांच्या निधनाने राजापूरसह तालुक्यातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, 2 सप्टेंबररोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसम, 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुण, 6 सप्टेंबररोजी गिरीराजनगर येथील 59 वर्षीय इसम (हा मृत्यु बाह्य जिल्ह्यात गणला गेला आहे.), पंपींग स्टेशन येथील 73 वर्षीय महिला, चिखलीतील 76 वर्षीय महिला व घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम, 11 सप्टेंबररोजी हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसम, 14 सप्टेंबररोजी वेल्हाळे येथील 65 वर्षीय व मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, 15 सप्टेंबररोजी कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, 18 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 74 वर्षीय इसम, 19 सप्टेंबररोजी मनोली येथील 70 वर्षीय इसम व सोमवारी 22 सप्टेंबररोजी गांधी चौक परिसरातील 70 वर्षीय व राजापूरमधील 78 वर्षीय इसमाच्या रुपाने या महिन्यातील सोळावा कोविड बळी गेला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८७.३७ टक्के झाले आहे. आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ९२३ ने वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ३१३ झाली आहे.

आज जिल्हा शासकीय प्रयोगशाळेच्या स्त्राव तपासणीतून १७०, खाजगी प्रयोगशाळेच्या तपासणीतून ४२३ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून ३३० स्त्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ७२, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपूर ०५, नेवासा ०१, श्रीगोंदा ०८, पारनेर ०३, अकोले १४, राहुरी ०२, कोपरगाव ०८, जामखेड १०, लष्करी रुग्णालय ३५ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्र १४९, राहाता १५, पाथर्डी ०९, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर २९, लष्करी परिसर ०६, नेवासा २६, श्रीगोंदा ०४, पारनेर २३, अकोले १०, राहुरी ४१, शेवगाव ०९, कोपरगाव ०७, जामखेड १८ आणि कर्जत ०६ येथील रुग्णांना संक्रमण झाले आहे.
तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २९, राहाता ५०, पाथर्डी १८, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर ०५, लस्करी परिसर १२, नेवासा ११, श्रीगोंदा १२, पारनेर ३४, अकोले १२, राहुरी १९, शेवगाव १९, कोपरगाव ३५, जामखेड १६ अशा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यासोबतच आज जिल्ह्यातील ७४४ रुग्णांना विविध ठिकाणच्या कोविड केअर हेल्थ सेंटर मधून डिस्चार्ज मिळाला. त्यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र १५४, संगमनेर ४३, राहाता ७९, पाथर्डी ३६, नगर ग्रामीण ३२, श्रीरामपूर ३५, लष्करी परिसर ०४, नेवासा ७४, श्रीगोंदा २९, पारनेर २८, अकोले २०, राहुरी १०९, शेवगाव २९, कोपरगाव ३१, जामखेड १७, कर्जत ११, लष्करी रुग्णालय १२ व इतर जिल्ह्यातील एका सग्णाचा समावेश आहे.
- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्ण संख्या : ३४ हजार १२५..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले रुग्ण : ४ हजार ३१३..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ६४४..
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ३९ हजार ८२..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३७ टक्के..
- जिल्ह्यातील ७४४ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला तर ९२३ बाधितांची नव्याने भरही पडली..

