खडकी प्रकरणात माझ्यासह कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप नाही ः पिचड
खडकी प्रकरणात माझ्यासह कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप नाही ः पिचड
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना संकट भयंकर असताना इतर विषयांवर चर्चा करण्याची ही वेळ नाही, असा विचार मनात बाळगून मी काम करत आहे. तालुक्यातील खडकी येथील प्रकरणाचा तपास राजूर पोलीस करत असून, त्यात माझा किंवा कार्यकर्त्यांचा कुठलाही हस्तक्षेप नाही. आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण केलेले नाही, आणि भविष्यताही करणार नसल्याची दर्पोक्ती माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली आहे.

राजकारण हे जनतेला सोबत घेऊन जनतेसाठी करायचे असते. हे कुठल्याही लोकप्रतिनिधीने समजून घेतले पाहिजे. सध्या स्या तालुक्यावर कोरोनाचे भयावह संकट आहे. मात्र, तालुक्यात आरोग्य सुविधेबाबतच्या उपाययोजना आणि उपलब्धतेचा मोठा प्रश्न आहे. त्यात सरकारकडून विकासकामांना कुठलाही निधी मिळत नसल्याने विकास कामेही ठप्प झाली आहे. अशा विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असून, ते खडकी प्रकरणावर राजकारण करण्यातच मश्गुल असल्याचा टोला माजी आमदार पिचड यांनी हाणला आहे.

