चंदुकाका सराफतर्फे ‘जीत लो दिल उसका कलेक्शन’चे आयोजन दागिने खरेदी करुन जिवलगांबद्दल प्रेम व्यक्त करण्याची अनोखी संधी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाविन्यता व आधुनिकतेचा मेळ साधत चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड नेहमीच अप्रतिम दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन्स सादर करीत असतात. फेब्रुवारी महिन्यात जिवलगाबद्दल प्रेम व्यक्त करण्यात येत असते. यासाठीच चंदुकाका सराफने प्रेमात पडलेल्या प्रत्येकांसाठी ‘जीत लो दिल उसका कलेक्शन’चे आयोजन करण्यात आले आहे.

जीत लो दिल उसका कलेक्शन या कलात्मक दागिन्यांच्या श्रेणीमध्ये आजच्या जमान्याला आणि आजच्या आधुनिक स्त्रीला साजेल अशा मनमोहक हिर्‍यांच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार चंदुकाका सराफच्या विविध शाखांत उपलब्ध आहेत. या श्रेणीमधील प्रत्येक दागिना सर्वोत्तम असून, हा अप्रतिम दागिना प्रत्येक ठिकाणी म्हणजे ऑफिसच्या पार्टीपासून ते अगदी जिमपर्यंत किंवा कोणत्याही समारंभात देखील घालता येणार आहे.

यावेळचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी अप्रतिम सोने व हिर्‍यांच्या दागिन्यांच्या साथीने, याचबरोबर हिर्‍यांच्या मंगळसूत्रांचे हे कलेक्शन आनंदी आणि खास आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये 25 हजार रुपयांपासून सुरु होणार्‍या श्रेणीमध्ये हिर्‍यांचे मंगळसूत्र सादर आहेत. यानिमित्ताने हिर्‍यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे. हिर्‍यांचे कानातले अलंकार 15 हजार रुपयांपासून पुढे सादर करण्यात आले आहेत. याचबरोबर रोझ गोल्ड प्रकारातील आकर्षक दागिन्यांचेही असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. हा महोत्सव चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व शाखांमध्ये 13 मार्च, 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी आजच दालनाला भेट देऊन दागिने खरेदीचा आनंद लुटा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 151 Today: 1 Total: 1411824

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *