चंदुकाका सराफ सुवर्णपेढीने जपली सामाजिक बांधिलकी मतिमंद मुलांच्या शाळेस ई-लर्निंग साहित्य देण्यासह भंडारी भगिनींनाही केली मदत

नायक वृत्तसेवा, नगर
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अहमदनगर येथील नुकत्याच उद्घाटन झालेल्या नवीन सुवर्णदालनात एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम पार पडला. अहमदनगर शहरातील टिळक रस्ता येथे गेली 40 वर्षे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसनाचे भरीव काम करीत असलेल्या मतिमंद विकास मंडळ संचलित मतिमंद मुलांच्या शाळेस नुकतेच चंदुकाका सराफ सुवर्णपेढीच्यावतीने ई-लर्निंग साहित्य देणगी स्वरूपात देण्यात आले.

याचबरोबर पारनेर तालुक्यातील अळकुटे गावच्या शीतल, भाग्यश्री आणि साक्षी या भंडारी कुटुंबातील तीन भगिनी धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यातून मिळणार्‍या बक्षिसांच्या रकमेतून आपल्या वडिलांवरील उपचारांचा खर्च भागवीत आहेत. या गोष्टीची त्वरीत दखल घेत चंदुकाका सराफ सुवर्णपेढीने या भगिनींना मदतीचा हात पुढे केला. ज्या नैतिक मूल्ल्यांच्या आधारावर चंदुकाका सराफ सुवर्णपेढी पारदर्शी व्यवसायाचा वारसा जपत आली आहे त्याला यावर्षी 195 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या वाटचालीमध्ये सर्वात महत्वाचा वाटा असंख्य आणि अमूल्य ग्राहकांचा आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे फक्त व्यवसाय न करता व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकीच नातं जपण्यास आणि समाजातील वंचित घटकांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या परीने हातभार लावण्याला सुवर्णपेढीने नेहमीच प्राधान्यक्रम दिलेला आहे.

आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते मतिमंद विकास मंडळाच्या पदाधिकार्‍यांना ई-लर्निंग साहित्य प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर भंडारी कुटुंबातील तीन भगिनींना 20 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमास प्रकाश नगरी, सुधीर तावरे, अशोक ठोंबरे, आदेश चंगेडिया, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.चे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Visits: 14 Today: 1 Total: 119140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *