पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा कोपरगावमध्ये काँग्रेसकडून निषेध तहसीलदारांना दिले निवेदन; भाजपवरही केली सडकून टीका

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या घोषवाक्याची चिरफाड करत ‘बेटी बचाओ बेटी पटाओ’ असे म्हणत महिला व मुलींचा अपमान केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा कोपरगाव काँग्रेसकडून निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन दिले.

कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस तथा महिला काँग्रेसच्यावतीने राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव सायली दीपक पालखेडकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अ‍ॅड.शीतल देशमुख, शहराध्यक्ष सुनील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सायली पालखेडकर म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पटाओ’ म्हणतात यातूनच भाजपाची संस्कृती दिसून येते. देशभरात घडणार्‍या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनामध्ये भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव, मिर्झापूर, सतना, मध्य प्रदेशातील पन्ना, पश्चिम बंगालमध्ये बिरभूम या अनेक प्रकारणांमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी आहेत. आता तर खुद्द देशाचे पंतप्रधान ‘बेटी पटाओ’ म्हणतायेत. मुंबई भाजपचे एक आमदार मुलींना पळवून आणण्याचा सल्ला देतायेत. मी देशातील माता-भगिनींना आवाहन करते ज्यांना आपला आदर नाही अशा पक्ष नेतृतवाला आणि पक्षाला देशातून, राज्यातून हद्दपार करायची वेळ आली आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय जाधव, शब्बीर शेख, सुनीता मुंतोडे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 79728

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *