तरुणाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलीस कोठडी कोपरगावमध्ये दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून केला तरुणाचा खून

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह इतर तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता मुख्य आरोपीस 10 जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुल रवींद्र माळी (रा. मोहनीराज नगर) अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.

सोमवारी कोपरगावच्या आठवडे बाजारात भर दुपारी राजेंद्र भोसले याचा लोखंडी रॉड, गज, फावड्याचा दांडा याने वार करून, तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खून झाल्याचे समजताच सायंकाळी गोपाळवाड्यातून शे-दोनशे तरुणांचा घोळका कोपरगाव शहरात आला. त्यांनी तत्काळ आरोपींना अटक करा, अशी मागणी केली. या संतप्त जमावाने संत जनार्दन स्वामी य दवाखान्याचे व रुग्णवाहिकेच्या काचा फोडून नुकसान केले. काहीवेळ साई तपोभूमी चौकात रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केल्यामुळे जमाव शांत झाला. या प्रकरणातील तीन फरारी आरोपी मटकी कानडे (पूर्ण नाव कळू शकले नाही, रा.लिंबारा मैदान), गफूर अब्दुलगनी बागवान (रा. लिंबारा मैदान) आणि राहुल गणेश मगर (रा. गोरोबानगर) यांना अटक केली. तर मुख्य आरोपी राहुल माळी यालाही अटक 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Visits: 213 Today: 1 Total: 1915493

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *