थोरातांच्या हस्ते रायतेवाडी शिवबंधार्याचे जलपूजन
थोरातांच्या हस्ते रायतेवाडी शिवबंधार्याचे जलपूजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील वाडी-वस्तीवर साखळी बंधार्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्व बंधारे तुडूंब भरले आहेत. रायतेवाडी व संगमनेर खुर्द शिवावर असलेल्या आडव्या ओढ्यामधील शिवबंधार्याचे जलपूजन कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, अमृतवाहिनी बँकेचे संचालक सुभाष गुंजाळ, दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर, सरपंच अजित शिंदे, गुलाब शेख, रमेश सुपेकर, नवनाथ गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, शिवाजी खुळे, बाबा खरात, सौ.ढगे, भारत ढगे आदी उपस्थित होते. शिवबंधारा तुडूंब भरल्याने परिसरातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.

