शहरातील इंदिरानगर भागात रुग्णांची संख्या वाढली! पंजाबी कॉलनी, ऑरेंज कॉर्नर व माळीवाड्यात पुन्हा आढळले संक्रमित रुग्ण..
नायक वृत्तसेवा संगमनेर
तालुक्याच्या रुग्णसंख्येत दररोज भर पडण्याची श्रृंखला कायम असून आजही तालुक्याच्या रूग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. शासकीय व खासगी प्रयोगशाळेच्या अहवालांसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून तालुक्यात आज 46 रुग्ण आढळून आले. आजच्या अहवालातूनही शहरातील 15 जणांसह ग्रामीण भागातील 31 रुग्ण संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून तेथील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडल्याने बाधितांची संख्या 2 हजार 562 वर पोहोचली आहे.
गेल्या महिन्याभरापासून संगमनेर तालुक्याच्या रुग्ण संख्येत दररोज मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातही शहरातील संक्रमितांची संख्या कमी होत असल्याने काहीसे आश्चर्यही व्यक्त केली जात आहे. शहरातील रुग्णसंख्या नैसर्गिकपणे कमी होत आहे की, प्रशासनाने शहरी संशयित रुग्णांची तपासणीच बंद केली आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्यातच प्रशासनाने मालपाणी लॉन्स येथे सुरु असलेले स्वॅब संकलन केंद्र बंद केल्याने शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे. त्यातच बाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्राव घेतले जात नसल्याचीही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या प्रशासनाच्या सद्यस्थितीतील भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. आजच्या अहवालातूनही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातून तुरळक रुग्ण समोर आले आहेत.
आज खासगी प्रयोगशाळेकडून 23, शासकीय प्रयोगशाळेकडून अवघे दोन, तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील 15 जणांचा तर ग्रामीण भागातील एकतीस जणांचा समावेश आहे. शहरातील इंदिरानगर या गजबजलेल्या परिसरात कोविडचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसत असून तेथील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 62 व 48 वर्षीय इसम, 15 व आठ वर्षीय मुले, 75, 44 व 40 वर्षीय महिला व तीन वर्षीय बालिका, पंजाबी कॉलनी परिसरातील 80 वर्षीय ज्येष्ठ महिला, ऑरेंज कॉर्नर येथील 35 वर्षीय तरुण, विद्यानगर मधील 48 व 46 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, स्वामी समर्थनगर मधील 70 वर्षीय महिला व माळीवाड्यातील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला संक्रमण झाले आहे.
शहरा सोबतच ग्रामीणभागातील 31 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात आंबी दुमाला येथील 31 वर्षीय तरुणासह 26 वर्षीय महिला, कुरकुटवाडीतील 31 व 27 वर्षीय तरुण व 26 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 22 वर्षीय महिला, देवकौठे येथील 49 वर्षीय इसम, लोहारे येथील 43 वर्षीय तर कासारे येथील 28 तरुण, तर चिंचपूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65, 37, 30 व 28 वर्षीय महिला, तसेच चार वर्षीय बालक व दोन वर्षीय बालिका, निमोण येथील 58 वर्षीय महिलेसह 30 व 21 वर्षीय तरुण,
साकुर मधील 52 वर्षीय महिला, मिर्झापूर येथील पंधरा वर्षीय तरुणी, गुंजाळवाडी येथील 52 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 35 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 44 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 56 वर्षीय इसम, धांदरफळ बुद्रुक मधील 40 वर्षीय तरुण व 40 वर्षीय महिला, निमज येथील 46 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 40 वर्षीय तर कासारा दुमाला येथील 41 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. आजच्या रुग्ण संख्येतही 46 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांचा आकडा 2 हजार 562 वर पोहोचला आहे.
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७८ टक्के..
- जिल्ह्यात आज ९२२ बाधितांची नव्याने भर..
- जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या : २९ हजार ८५..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले रुग्ण : ५ हजार ८१..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ५४९..
- जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या : ३४ हजार ७१५..
अहमदनगर जिल्ह्यात आज ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरसरी प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकुण रुग्णसंख्येत ९२२ रुग्णांची वाढ झाली. यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८१ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र १८५, संगमनेर ०२, राहाता ०१, पाथर्डी ०२, श्रीरामपूर १४, नेवासा २३, श्रीगोंदा ०४, पारनेर ०६, अकोले १५, राहुरी ०८, कोपरगाव ०७, जामखेड ०२, लष्करी रुग्णालय २१, इतर जिल्ह्यांतील ०२ रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या जिल्ह्यातील ३३० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र ११३, संगमनेर २३, राहाता ५०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण १७, श्रीरामपुर ४८, नेवासा १०, श्रीगोंदा ०८, पारनेर १४, अकोले ०९, राहुरी २३, शेवगाव ०१, कोपरगाव १६, जामखेड ०२ आणि कर्जत ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीतून जिल्ह्यात आज २९९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रात १९, संगमनेर २१, राहाता २०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर १८, लष्करी क्षेत्र ०४, श्रीगोंदा २२, पारनेर १०, अकोले १६, राहुरी ४१, शेवगाव ३८, कोपरगाव १३, जामखेड २६ आणि कर्जत १० येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ५७३ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज..
यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, लष्करी परिसर ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, लष्करी रुग्णालय ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.