अकोले तालुक्यात गुरुवारी तेवीस कोरोनाबाधित सापडले
अकोले तालुक्यात गुरुवारी तेवीस कोरोनाबाधित सापडले
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांनी गुरुवारी (ता.17) एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर दोन दिवसांत दोघांचा बळी गेल्याने कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या 19 झाली आहे. दरम्यान, गुरुवारी तालुक्यात नव्याने 23 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकूण रुग्णसंख्या 1013 वर पोहोचली आहे.

गुरुवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अॅन्टीजेन टेस्टमध्ये गणोरे येथील 52 वर्षीय, 30 वर्षीय आणि 28 वर्षीय महिला तर 33 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय मुलगा आणि 4 महिन्याचे बाळ, वीरगाव येथील 37 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय मुलगी, नवलेवाडी येथील 57 वर्षीय पुरूष, रेडे येथील 25 वर्षीय तरुण, कोतूळ येथील 46 वर्षीय महिला, अंभोळ येथील 35 वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील 21 वर्षीय तरुण, 30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, राजूर येथील 55 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय पुरूष, औरंगपूर येथील 44 वर्षीय पुरूष, खासगी प्रयोगशाळेतील अहवालात शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष, राजूर येथील 58 वर्षीय व 49 वर्षीय पुरूष अशा एकूण 23 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत 841 रुग्णांनी कोरोनावर मत मात केली असून, सध्या 153 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

