कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा!
कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा!
कोपरगाव शहर शिवसेनेची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने सोमवारी मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकर्यांना बसला असून शेतकर्यांमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रचंड नाराजी वाढली आहे. केंद्र सरकाने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकर्यांच्या दृष्टीने अतिशय घातक असून त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या निर्णयावर फेरविचार करुन कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, असे निवेदन कोपरगाव शहर शिवसेनेच्यावतीने बुधवारी (ता.16) तहसीलदारांना देण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये शेतकर्यांना कोणकोणत्या अडचणींना भविष्यात सामोरे जावे लागेल याचा कुठलाही विचार न करता सरळसरळ कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर जे शिक्कामोर्तब केले आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. तसेच अतिवृष्टीमुळे आधीच शेतकर्यांचे बरेचसे नुकसान झालेले असताना पुन्हा हा निर्णय घेऊन केंद्र सरकार शेतकर्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे का हाच प्रश्न उपस्थित होतो आहे. केंद्र सरकारने सदर निर्णयाचा फेरविचार करून लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

सध्याची शेतकरी बांधवांची अतिवृष्टीमुळे झालेली परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकर्यांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होत असून केंद्र सरकारने या निर्णयावर फेरविचार करुन कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष रवींद्र कथले, उपशहरप्रमुख बालाजी गोर्डे, संतोष जाधव, कुणाल लोणारी, सागर जाधव, अमोल शेलार, अनिल आव्हाड, आदिनाथ ढाकणे, संघटक वसीम चोपदार, अमित बांगर, सागर फडे, सनी काळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, युवासेना शहरप्रमुख नितीष बोरुडे, सिद्धार्थ शेळके, युवासेना उपशहरप्रमुख ऋषी धुमाळ, शिवम नागरे, मयूर फुकटे, प्रीतेश जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख विजय भोकरे, प्रशांत बोरावके, अक्षय गुंजाळ, विजय गोर्डे, गणेश घुगे, अभिषेक सारंगधर, विशाल औटी आदिंनी केली आहे.

