बंदुकीचा धाक दाखवून पैशाने भरलेली बॅग लांबविली खडका फाटा येथील प्रकार; परिसरात पसरले भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, नेवासा
बंदुकीचा धाक दाखवून पैशाने भरलेली बॅग पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

बाजार समिती जवळील एका खाद्यतेल कंपनीमधून कंपनीच्या मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेटजवळ आला. त्यावेळी समोरच काट्यात दबा धरून बसलेल्या चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना शुक्रवारी (ता.12) सायंकाळच्या सुमारास घडली असून चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.

दरम्यान, या घटनेत मुलास कुठलीही इजा झालेली नाही. घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळाची पाहणी केली आणि तत्काळ तपासाच्या अनुषंगाने कर्मचार्‍यांना सूचना करून परिसरात नाकाबंदीसाठी रवाना केले. यावेळी घटनास्थळी नागरिक तसेच व्यापारी मोठ्या संख्येने जमा झाले होते.

Visits: 173 Today: 1 Total: 2121559

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *