कोकणातील पूरग्रस्तांसाठी जाणार संगमनेरातून मदतीचा रथ! सर्वस्व गमावलेल्यांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात द्या : आमदार डॉ.तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह कोकणातील जीवन अक्षरशः उध्वस्त झाले आहे. अनेकांची घरे वाहून गेली, संसार होत्याचे नव्हते झाले. दुकाने व त्यातील सामानाचा नास झाल्याने हजारों नागरिकांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. आपल्या नागरिकांवर झालेल्या निसर्गाच्या प्रकोपातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असताना आता काँग्रेसप्रणित युवक कॉग्रेस व एनएसयूआयच्यावतीने पूरग्रस्तांसाठी आवश्यक मदत पोहोचवण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला असून संगमनेरकरांकडून प्राप्त होणारी मदत पुराने सर्वस्व गमावलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आजपासून पुढील पाच दिवस शहरातील जाणता राजा मैदानावर नागरिकांकडून ऐच्छिक मदत स्वीकारली जाणार असून त्याचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पन्नास हजार रुपयांचा धनादेश देत आज केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी संगमनेरकरांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही केले.

संगमनेरातील जाणताराजा मैदान येथे युवक काँग्रेस, जयहिंद लोकचळवळ, एनएसयूआय, अल्पसंख्यांक काँग्रेस, अनुसूचित जाती-जमाती सेल यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, भाऊसाहेब कुटे, नवनाथ अरगडे, संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा, एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, नगरसेवक नितीन अभंग, किशोर टोकसे, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, हैदर अली, जावेद शेख, सुमित वाघमारे, शेखर सोसे आदी यावेळी उपस्थित होते. आमदार डॉ.तांबे यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश देत या मोहिमेचा शुभारंभ केला.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संगमनेरातील व्यापारी वर्गाने राज्यातील व देशातील नागरिक संकटात असताना नेहमीच त्यांना मदतीचा हात दिला आहे. यावेळीही संगमनेरकर आपली सामाजिक कणव दाखवतील असा विश्वास आहे. मागील आठवड्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने तेथील अनेक नद्यांना महापूर आले. यामध्ये अनेक नागरिकांचे हाल झाले, अनेकांना आपले जीवही गमवावे लागले. वेळोवेळी राज्यात आलेल्या अशा संकटकाळात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरकरांनी नेहमीच मदतीचा हात दिला असून या संकटातही आपण तालुक्याच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूरग्रस्तापर्यंत मदत पोहोचवण्याची जबाबदारी युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या स्वयंसेवकांनी स्वीकारली असून मदतीचा रथ घेवून ते पूरग्रस्त भागात जाणार आहेत. मानवतेसाठी सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या की, आजच्या स्थितीत पूरग्रस्तांसाठी पाठविलेली कोणतीही मदत त्यांच्यासाठी अत्यावश्यक बनली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पुढे होवून आपल्याच बंधू-भगिनींना पुन्हा उभे करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आपल्या तालुक्याने नेहमीच मदतीची परंपरा जोपासली आहे. ही परंपरा यावेळीही अव्याहत राहील व संगमनेरातून पपूरग्रस्तांसाठी आपल्या तालुक्याची एक वेगळी परंपरा असून ती आपण प्रत्येकाने जोपासावी असे आव्हान त्यांनी केले. इंद्रजीत थोरात यांनी तालुक्यातील तरुणांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नदीम कुरेशी, श्रेयस करपे, मनीष राक्षे, हर्षवर्धन सातपुते, सुहास आहेर, गणेश गुंजाळ, दीपक कदम, ऋतीक राऊत, अनिकेत आंबरे, विजय उदावंत, अमित गुंजाळ, हेमंत बोचरे, ओंकार बागडे, हर्षल रहाणे, राहुल भालेराव, प्रथमेश मुळे, विकास जाधव, दत्ता वाकचौरे, बाजीराव शेरमाळे, किशोर बोराडे, कलीम कादरी, अलोक बर्डे, सनी ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

