मंत्री नवाब मलिकांविरोधात संगमनेरात भाजपचे आंदोलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेणार्या मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने केली आहे. याशिवाय मंत्री मलिक यांच्या विरोधात संगमनेरात भाजप युवा मोर्चाच्यावतीने तीव्र निदर्शन करण्यात येवून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढून निषेध व्यक्त केला. मंत्री मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकले असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे व आजपर्यंत एसटी कर्मचार्यांच्या 40 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहे, कर्मचार्यांचा संप सुरू आहे. त्यावर न बोलता त्यांच्या मनात एका अधिकार्याबद्दल असलेल्या द्वेषापोटी हे सगळे बोलत असतात. तरी त्यांनी असे वागणे सोडले नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीराज डेरे यांनी दिला आहे. या आंदोलनात भाजपाचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा कोषाध्यक्ष केशव दवंगे, किरण गुंजाळ, डॉ.गुंजाळ महाराज, अरुण शिंदे, कल्पेश पोगुल, हरीश वलवे, संतोष हांडे, अनिल निळे, शिवाजी आहेर, धनंजय पवार, कोंडाजी कडनर, ओंकार घुगे, विकास गुळवे, अविनाश ओझा, संजय वाकचौरे, अनंत मोकळ, रोहिदास साबळे, वाल्मिक शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी होते.