केवळ दैवबलवत्तर असल्याने कारमधील तिघे बालंबाल बचावले

नायक वृत्तसेवा, घारगाव
नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे (ता.संगमनेर) शिवारात पलटी झाली. त्यावेळी महामार्गावर वाहने धावत नसल्याने केवळ दैवबलवत्तर असल्याने कारमधील तिघेही बालंबाल बचावले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नाशिक येथील राहुल पंडितराव भांगरे, शुभांगी राहुल भांगरे व धनुष राहुल भांगरे (वय 4) हे तिघे कारमधून (क्रमांक एमएच.12, क्यूटी.8373) सोमवारी (ता.8) सकाळी पुण्याच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात आले असता गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटी झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, केवळ दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघेही बालंबाल बचावले. या अपघाताची माहिती नागरिकांनी घारगाव पोलिसांना दिली. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ, गणेश लोंढे यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत घेतली मदतकार्य केले.

Visits: 97 Today: 2 Total: 1100835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *