साकूरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी परस्परविरोधी फिर्यादीवरुन 26 जणांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे शेतीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी (ता.7) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांत 26 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर येथील रफीक अब्दुल पटेल, इसाक पटेल, सद्दाम निसार पटेल, इम्रान इसाक पटेल, एजाज इसाक पटेल यांना शेतीच्या वादातून नासिर कादर मिस्तरी, आसिक कादर मिस्तरी, मुज्जु आसिक मिस्तरी, सलमान युसून चौगुले, साहिल युनूस चौगुले, गुड्डू इब्राहिम पटेल, आयशा नासिर मिस्तरी, बुभ्या मन्सूर पटेल, रुकसाना मन्सूक पटेल, नूरजहाँ इब्राहिम पटेल, दिलशान युनूस चौगुले व रिहान नासिर मिस्तरी या बारा जणांनी वरील पाच जणांना लोखंडी रॉड, फावडे, लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जबर जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रफीक पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बारा जणांविरोधात गुरनं.252/2021 भादंवि कलम 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीत नासिर कादिर मिस्तरी यांनी म्हटले आहे की, माझ्यासह आसिफ कादर मिस्तरी, साहिल युनूस चौगुले, रुकसाना मन्सूर पटेल यांना शेतीच्या वादातून सद्दाम निसार पटेल, एजाज इसाक पटेल, इम्रान इसाक पटेल, इस्माईल रुस्तुम पटेल, अल्ताफ अब्बास पटेल, आसिफ इब्राहिम सय्यद, परवेज अल्ताफ पटेल, वसीम दादा पटेल, निसार अब्दुल पटेल, इसाक अब्दुल पटेल, दादा अब्दुल पटेल, रफीक अब्दुल पटेल, अजहर रफीक पटेल व इस्माईल अब्बास पटेल यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडा, दगड व लाथाबुक्क्यांनी जबरी मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन पोलिसांनी वरील चौदा आरोपींविरोधात गुरनं.253/2021 भादंवि कलम 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहे.
