अमोल बोर्‍हाडे यांची भारतीय वनाधिकारीपदी निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चंदनापुरी येथील अमोल रावसाहेब बोर्‍हाडे यांची नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन अधिकारीपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगात निवड झालेले संगमनेर तालुक्यातील चर्मकार समाजातले अमोल बोर्‍हाडे पहिले अधिकारी आहेत. त्यांनी चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी येथे माध्यमिक, न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर उच्च माध्यमिक शिक्षण घेतले आहे. पुढे अभियांत्रिकी शिक्षणासाठी ते डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आकुर्डी येथे होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ते 2016 पासून दिल्लीत होते. त्यांच्या या प्रवासात त्यांना त्यांचे बंधू व पोलीस अधिकारी सतीश बोर्‍हाडे यांनी पाठबळ दिले. त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे आदिंनी अभिनंदन केले आहे.

Visits: 186 Today: 1 Total: 2126289

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *