नवीन शिक्षण धोरण मसुद्याची ‘छात्रभारती’कडून होळी

नवीन शिक्षण धोरण मसुद्याची ‘छात्रभारती’कडून होळी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारने नुकत्याच आणलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा-2020ची छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आज संगमनेर प्रांत कार्यालयासमोर होळी करत तीव्र विरोध दर्शविला आहे.


सदर शैक्षणिक मसुदा हा शिक्षणाचे बाजरीकरणाला बळ देणारा आहे. गरिबांना शिक्षण नाकारणारा असून भांडवलदारांच्या फायद्यासाठी आखलेला आहे, असा घणाघाती आरोप छात्रभारतीने यावेळी केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या नव्या शिक्षण धोरणाला विरोध करावा. आणि सरकारने या मसुद्याचा पुर्नविचार करावा, अन्यथा लवकरच या धोरणाविरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छात्रभारतीचे उपाध्यक्ष अनिकेत घुले, संघटक प्रवीण गुंजाळ, कार्याध्यक्ष तुषार पानसरे, राहुल जर्‍हाड, तृप्ती जोर्वेकर, सोमा फापाळे यांनी दिला आहे.

Visits: 161 Today: 1 Total: 2120239

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *