कोपरगावमध्ये पेट्रोल पंपाला हार घालून इंधन दरवाढीचा निषेध तहसीलदारांना निवेदन देत लवकरात लवकर इंधर दर कमी करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
संपूर्ण देशात इंधनाच्या दरांनी रचलेल्या नव्या विक्रमांनी महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन जगणे असह्य झाले आहे. त्यावर केंद्र सरकारकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या रोषाची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून बुधवारी (ता.22) आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढून पेट्रोल पंपाला हार घालून दरवाढीचा निषेध करण्यात आला.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारकापासून ते एस. जी. विद्यालय, छत्रपती संभाजी स्मारक, अण्णाभाऊ साठे स्मारक, बसस्थानक ते तहसील कार्यालय अशी सायकल रॅली काढून इंधनाचे दर लवकरात लवकर कमी करावेत, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहराध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, दिनकर खरे, फकीर कुरेशी, रावसाहेब साठे, जावेद शेख, राहुल देवळालीकर, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र खैरनार, संदीप सावतडकर, अशोक आव्हाटे, इम्तियाज अत्तार, संतोष वढणे, सागर लकारे, फिरोज पठाण, योगेश नरोडे, राकेश शहा, रोशन शेजवळ, पुंडलिक वायखिंडे, भीमराव दहे, संतोष शेलार, अक्षय आंग्रे, दिनेश संत, संतोष शेजवळ, गणेश बोरुडे, कैलास महालकर, लक्ष्मण सताळे, हारुन शेख, तेजस साबळे, अझहर शेख, किशोर डोखे, नितीन जाधव, आकाश जगताप, राजू ठाकरे, रितेश राऊत, ओंकार वढणे, असीफ शेख, नीलेश शिंदे आदी उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 79474

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *