सराईत दुचाकी चोरट्यांची टोळी पोलिसांनी पकडली श्रीरामपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी; दहा दुचाकींसह एक टेम्पो जप्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सराईत दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दहा चोरी गेलेल्या दुचाक्यासह एक टेम्पो चोरट्यांकडून जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने दुचाक्या चोरी केल्याची माहिती उघड झाली आहे.

चोरीची दुचाकी घेवून सराईत आरोपी योगेश रमेश हिवाळे (रा.पढेगाव) हा विक्रीसाठी श्रीरामपूरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक संजय सानप यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून (एमएच.20, सीबी.9122) व (एमएच.17, एके.0650) क्रमांकाच्या दोन चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन राघू शिंदे (वय 23, रा.मूलनमाथा, पिंपळाचा मळा, राहुरी), जावेद बशीर सय्यद (वय 28, रा.राहुरी), रामनाथ वसंत गायकवाड (रा.पढेगाव, ता.श्रीरामपूर) असे अन्य आरोपींची नावे असून त्यांनी विविध ठिकाणी वाहन चोर्‍या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करुन त्याच्याकडून दहा चोरीच्या दुचाकींसह एक टाटा झीप टेम्पो जप्त केला आहे.


विविध तालुक्यांत गुन्हे दाखल…
दुचाकी चोरीतील आरोपी हे सराईत चोरटे असून त्यांच्याविरुध्द शिर्डी, राहुरी, मनमाड पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या दुचाक्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे (एमएच.16, आर.9707), (एमएच.20, सीबी.9122), (एमएच.17, एके.0650), (एमएच.16, एन.7182), (एमएच.17, एपी.6526), (एमएच.17, आर.4683) यांच्यासह आणखी तीन विना क्रमांकाच्या दुचाक्या चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केल्या आहे. तसेच (एमएच.17, ईजी.2089) क्रमांकाचा टाटा झीप टेम्पो जप्त केला आहे.

Visits: 204 Today: 1 Total: 2128021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *