मुक्या जनावरांना डांबून ठेवणार्‍यांवर गुन्हा दाखल करा!

मुक्या जनावरांना डांबून ठेवणार्‍यांवर गुन्हा दाखल करा!
बजरंग दलाची संगमनेर शहर पोलिसांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील गोवंश हत्या आणि तस्करी काही थांबण्याचे नाव घेईना. पोलिसांच्या जुजबी कारवाईने हा धंदा बिनबोभाटपणे सुरूच असल्याने बजरंग दलाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकतीच सुकेवाडी रस्त्यावरील शेतातील सहा गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका करुन संशयितांवर सुधारित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी बजरंग दलाने शहर पोलिसांकडे केली आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, सुकेवाडी रस्त्यावरील सुमीत लाजरस खरात यच्या शेतात 6 जिवंत जनावरे डांबून ठेवली होती. ही जनावरे कत्तलीसाठी आणली असल्याची गुप्त खबर मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोवंश जनावरांना जीवदया गोशाळेत रवाना केले आहे. या प्रकरणी शुक्रवार दि.11 सप्टेंबर, 2020 रोजी गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार करत आहे. दरम्यान, एमएच.15, डीके.6373 पिकअपमध्ये जव्हार-मोखाडा गावातून सुमीत खरात हा गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेवून येतो. या पिकअपवर याआधीही गोवंश संदर्भात 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच कुरण येथील कसाई शाकीर ऊर्फ मोनू मोहम्मद शेख कत्तल करतो. त्यामुळे पोलिसांच्या जुजबी कारवाईने मुक्या जनावरांचा जीव अजूनही जात असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबवावे. त्यानुसार वरील दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 सुधारित 195 चे कलम 5 अ व 5 ब आणि पशू-क्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 अ, ड, इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तक्रार विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातून केली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 30165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *