खासगी प्रयोगशाळांनी नियमांनुसार शुल्क आकारावे; शिवसेनेचे आवाहन
खासगी प्रयोगशाळांनी नियमांनुसार शुल्क आकारावे; शिवसेनेचे आवाहन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील चार खासगी प्रयोशाळांमध्ये कोविड -19 रॅपिड अँटीजेन टेस्ट चालू आहेत. या संदर्भात कोपरगाव शहर शिवसेनेने शासनाच्या नियमांनुसार आठशे रुपये शुल्क आकारावे आणि प्रयोगशाळेच्या दर्शनी भागात शुल्क फलक लावावेत असे आवाहन नुकतेच केले आहे.
उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने खासगी प्रयोगशाळेला 800 रुपये इतके शुल्क घेण्यास परवानगी दिली आहे. शहरात वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेस, निदान क्लिनिकल लॅब्रोटरी, सर्वदा क्लिनिकल लॅब्रोटरी व कोपरगाव क्लिनिकल लॅब्रोटरी या चार खासगी प्रयोगशाळा सध्या कविड-19 रॅपिड अँटीजेन टेस्ट करतात अशी माहिती दिली. त्यानंतर शहर शिवसेनेच्यावतीने वरील चारही प्रयोगशाळांना 800 रुपये शुल्क आकारण्यास आवाहन केले. त्याबाबतचे फलकही प्रयोगशाळेच्या दर्शनी भागात लावण्याचे सूचविले आहे. दरम्यान, कोविड-19 रॅपिड टेस्ट एस.एस.जी.एम, महाविद्यालय येथे सकाळी 10 ते 12 यावेळेत विनामूल्य सुरू आहे. तरी कोपरगावकरांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असेही आवाहन शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी एसटी कामगार सेनाध्यक्ष भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, युवा नेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख इरफान शेख, विजय शिंदे, सचिन मोरे व आदी शिवसैनिक उपस्थित होते.