देवळाली प्रवरामध्ये मृतावस्थेत बिबट्या मादी आढळली

देवळाली प्रवरामध्ये मृतावस्थेत बिबट्या मादी आढळली
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिरालगत असलेल्या खुरुद वस्ती जवळील सोयाबिनच्या पिकात सहा वर्षे वयाची बिबट्याची मादी सोमवारी (ता.14) मृतावस्थेत आढळून आली आहे.


या प्रकाराची बातती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच वनपाल परदेशी, लक्ष्मण किनकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तीन दिवसांपूर्वी या बिबट्या मादीचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव काकडे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. वैद्यकीय अहवालावरुन मूत्रपिंडाच्या आजाराने या मादीचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 1110767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *