नवले दूध डेअरीच्या चालकास दोघांची मारहाण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नवले दूध डेअरीत चालक असलेल्या तरुणास वाहनाचा किरकोळ अपघात झाल्यावरुन दोघांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी (ता.9) सकाळी घडली. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तालुका पोेलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, नवले दूध डेअरीच्या वाहनावर योगेश सोपान घोलप (वय 30, रा.कौठे धांदरफळ) हा चालक म्हणून काम करत होता. त्याच्याकडून वाहनाला किरकोळ अपघात होवून नुकसान झाले. याबद्दल अमित साहेबराव नवले (रा.विठ्ठल नगर, संगमनेर) व रवींद्र सोपान थोरात (रा.वडगाव पान) या दोघांनी लोखंडी गजाने मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच वाहन दुरुस्तीचा खर्च मागितला. या प्रकरणी जखमी चालक योगेश घोलप याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील दोघांविरोधात गुरनं. 438/2021 भादंवि कलम 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार एम. एन. जाधव हे करत आहे.

Visits: 198 Today: 1 Total: 2121547

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *