संगमनेर तालुक्याला कोविडचा पुन्हा एकदा “दे धक्का..!” ग्रामीणभागात कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा सिलसिला आजही कायम..
नायक वृत्तसेवा संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची व्याप्ती दिवसोंदिवस वाढतच आहे. एखाद्या दिवशी काहीसा दिलासा तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी जोरदार धक्का देण्याचे कोविड तंत्र आजही कायम आहे. काल रविवारी सायंकाळी दररोजच्या वाढत्या रुग्ण संख्येला काहीसा ब्रेक मिळाला होता. मात्र अवघ्या चोवीस तासातच तो फेलही ठरला. आज प्राप्त झालेल्या शासकीय प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील केवळ पाच जणांसह तालुक्यातील तब्बल 64 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या पुन्हा एकदा अडीचाव्या सहस्रकाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करताना 2 हजार 385 वर जाऊन पोहोचली आहे.
गणेशोत्सवादरम्यान 26 ऑगस्ट पासून संगमनेर तालुक्याच्या रुग्ण संख्येत दररोज मोठी भर पडत आहे. विशेष म्हणजे या पंधरा दिवसांच्या कालावधीत शहरातील रुग्णसंख्येत आश्चर्यकारकरीत्या घटही झाली आहे, तर ग्रामीण भागात दररोज नवनवीन गावांपर्यंत कोविडचे संक्रमण पोहोचत असून कुटुंबच्या कुटुंबं बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. प्रशासनाकडून वारंवार गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे, विनाकारण बाहेर न पडण्याचे व मूखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात येऊनही अनेक नागरिकांकडून त्याचे पालन होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत असल्याचे निष्कर्ष खासगी वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
आजही शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून सदतीस जणांचे, तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील अवघ्या चार जणांसह ग्रामीण भागातील तेहतीस जणांना कोविडची लागण झाली आहे. या अहवालातून शहरातील रंगारगल्ली येथील 47 वर्षीय तरुण, मोमिनपुरा भागातील 36 वर्षीय महिला, मेनरोड वरील 59 वर्षीय इसम व इंदिरानगर परिसरातील तीस वर्षीय महिलेला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
त्यासोबतच तालुक्यातील गुंजाळवाडीमध्ये कोविडचा उद्रेक झाला आहे. तेथील दोन कुटुंबातील सात जणांसह एकूण दहा जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात 50 वर्षीय इसमासह 28 वर्षीय व एकोणीस वर्षीय तरुण, 40, 35 व 24 वर्षीय महिला, तसेच 7, 5 व 4 वर्षांच्या दोन मुलांनाही संसर्ग झाला आहे. निमगाव जाळीतील 50 वर्षीय इसम, आश्वी बुद्रुक मधील तीस वर्षीय तरुण, कनोली येथील 23 वर्षीय तरुण, चिंचपूर मधील 75 वर्षीय व 70 वर्षीय महिलांसह 44 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 23 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 37 वर्षीय तरुण,
समनापुर येथील 21 वर्षीय तरुण, शेडगाव मधील 21 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 35 वर्षीय तरुण, पठार भागातील साकुर मधील 65 वर्षीय महिला, वनकुटे येथील 19 वर्षीय तरुणी, जवळे कडलग मधील 39 वर्षीय महिला, वेल्हाळ्यातील 50 वर्षीय महिलेसह नऊ व सहा वर्षीय बालिका, संगमनेर खुर्द मधील 65 वर्षीय इसमासह 64 वर्षीय महिला, शिबलापुर मधील 38 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 65 वर्षीय महिला व चंदनापुरीतील 75 वर्षीय वयोवृद्धासह 17 वर्षीय तरुणी असे एकूण सदतीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यासोबतच रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील चव्हाणपूरा भागातील 47 वर्षीय महिलेचा एकमेव अहवाल पॉझिटिव आला आहे. याव्यतिरिक्त आजच्या चाचण्यांमधून शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामीण भागातील कौठे खुर्द, जवळे कडलग व सादतपुर मधून दोन पेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. आजही शहरात केवळ 5 तर तालुक्यात 59 रुग्ण आढळून आले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचणीतून सावरगाव तळ येथील 43 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 39 वर्षीय तरुण, झोळे येथील 37 वर्षीय तरुण, कौठे खुर्द येथील 70 वर्षीय व 39 वर्षीय महिलांसह 14 वर्षीय बालिका, 42, 24, 18 वर्षीय तरुण, सादतपुर येथील 65 वर्षीय महिलेसह 47 24 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक मधील 67 व 63 वर्षीय इसम, मनोली मधील 26 व 16 वर्षीय तरुण,
वडगाव पान मधील 39 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 41 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 18 वर्षीय तरुणी, निमोण मधील 40 वर्षीय महिला, शिरापूर मधील 45 वर्षीय तरुण, तर जवळेकडलग मधील 52, 45, 19 व 15 वर्षीय महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजही तालुक्याच्या रुग्ण संख्येत 64 रुग्णांची नव्याने भर पडल्याने तालुक्यातील कोविड रुग्णसंख्येचा प्रवास अडीच हजारच्या टप्प्याकडे पुढे सरकताना 2 हजार 385 वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरासरी प्रमाण ८३.९२ टक्के आहे. काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजेपासून आज रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्येत १ हजार ३६६ रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची एकुण संख्या ४ हजार ६७७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७२० आणि अँटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण बाधीत आढळले.
आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोबी हेल्थ सेंटर मधून ८३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २५२, संगमनेर ८२, राहाता ५१,पाथर्डी ३६,नगर ग्रामीण ५१, श्रीरामपूर ५८, लष्करी परिसर १३, नेवासा ४५, श्रीगोंदा ३६, पारनेर २४, अकोले ३५, राहुरी ४८, शेवगाव ०६, कोपरगाव १७, जामखेड ३८, कर्जत ३३, लष्करी रुग्णालय ०३ आणि इतर जिल्ह्यातील ०७ रुग्णांचा समावेश आहे.
- * जिल्ह्यात आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या : २६ हजार ९९१..
- * जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : ४ हजार ६७७..
- * जिल्ह्यातील आज वरचे एकूण मृत्यू ४९५..
- * जिल्ह्यातील एकूण रुग्णाची संख्या : ३२ हजार १६३..
- * आत्तापर्यंत जिल्ह्यातील २६ हजार ९९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
- * जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.९२ टक्के..
- * जिल्ह्यातील ८३५ रुग्णांना आज घरी सोडले..
- * जिल्ह्यात आज १ हजार ३६६ रुग्णांची नव्याने भर..