आपत्ती काळात गरजूंना मदत करणारी व्यवस्था समाजाने उभारावी ः जोशी रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ

नायक वृत्तसेवा, अकोले
आपत्तीच्या काळात गरजू नागरिकांना तातडीची मदत करणारी व्यवस्था समाजाने समाजाच्या सहभागातून उभी करायला हवी. विकासाशी संबंधित प्रत्येक बाब शासन-प्रशासन करेल अशी अपेक्षा रास्त असली तरी काही वेळेस नागरिकांनी पुढे यायची आवश्यकता असते. रोटरी क्लब सारख्या समाजसेवी संस्था सामाजिक बांधिलकीतून करत असलेले काम प्रेरक आणि स्पृहणीय आहे, असे प्रतिपादन पत्रकार प्रसन्न जोशी यांनी केले.

अकोले येथील पंकज लॉन्स येथे रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसन्न जोशी बोलत होते. आमदार डॉ. किरण लहामटे, रोटरीचे उपप्रांतपाल दिलीप मालपाणी, पब्लिक इमेज डिस्ट्रिकट 3132 चे स्पेशल ऍडव्हायजर अमोल वैद्य, नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन आवारी, सचिव प्रा. डॉ. सूरिंदर वावळे, उपाध्यक्ष संदीप दातखिळे, खजिनदार गंगाराम करवर आदी उपस्थित होते.

शहरी भागात रोटरीचे काम आहेच. मात्र अलीकडे ग्रामीण आदिवासी भागात हे काम पाहून समाधान वाटते. रोटरीमुळे माणसे जोडली गेली असून रोटरी राजकारण्याच्या प्रशिक्षणाची शाळा बनावी अशी अपेक्षा पत्रकार प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केली. अकोले तालुका निसर्ग संपन्न असून कळसूबाई, अगस्ति महाराज मंदिर, मोठी धरणे येथे आहेत. तर पद्मश्री राहीबाई पोपरे, हेरंब कुलकर्णी यांच्या सारखे राज्य पातळीवर काम करणारे व्यक्तिमत्त्व तालुक्यात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रोटरी क्लबने करोना काळात आदिवासी डांग भागात आदिवासींचे समुपदेशन करून त्यांना लसीकरण करण्यास प्रवृत्त केले असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत पब्लिक इमेज डिस्ट्रिक्ट 3132 चे स्पेशल ऍडव्हायजर अमोल वैद्य यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष सचिन आवारी यांनी केले. सूत्रसंचालन दीपक महाराज देशमुख व घनश्याम माने यांनी केले. तर आभार सचिव प्रा. डॉ. सूरिंदर वावळे यांनी मानले. प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी संपादित केलेल्या रोटरी बुलेटिनचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अकोले तालुका एज्युकेशनचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, खजिनदार एस. पी. देशमुख, ज्येष्ठ नेते कॉ.कारभारी उगले, अ‍ॅड. के. बी. हांडे, सुरेश खांडगे, अशोक आरोटे, सुरेश गडाख, महेश नवले, प्रदीप हासे, माधव वैद्य, विनोद हांडे, नीलेश तळेकर, स्वप्निल नवले, हेरंब कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, डॉ. संजय ताकटे, डी. के. जेडगुले, शांताराम गजे, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, माजी उपप्रांतपाल सुनील कडलग, आनंद हासे, सतीश नेहे, बी. जी. वैद्य, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन शेटे, डॉ. रवींद्र डावरे, सुनील नवले, विक्रम नवले, प्रवीण झोळेकर, अनिल देशमुख, रोहिदास धुमाळ, नीलेश देशमुख, रोहिदास जाधव, यश चोथवे, रोहित गायकवाड, डॉ. सुधीर कोटकर, अरुण सावंत आदी उपस्थित होते.

कोरोनाने पती गमावलेल्या विधवांना शिलाई मशीनचे वाटप करत रोटरी क्लबने आपली सामाजिक बांधिलकी जपली. रोटरी क्लबच्या कार्यात सुरुवातीपासून मदत करणार्‍या तालुक्यातील पत्रकारांचा देखील कृतज्ञता म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Visits: 103 Today: 1 Total: 1415126

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *