संगमनेर शेतकी संघाचा गुणवत्तेतून राज्यात प्रथम क्रमांक ः आ. डॉ. तांबे शेतकी संघाची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी यांच्या मदतीकरता उभ्या केलेल्या सर्व सहकारी संस्था महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत काम करत आहेत. राज्यातील बहुतांश शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ हा दिमाखात उभा असून राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या 62 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपत डोंगरे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, इंद्रजीत थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मण कुटे, गणपत सांगळे, संतोष हासे, शेतकी संघाचे संचालक रंगनाथ फापाळे, अर्जुन घुले, सुनील कडलग, आत्माराम हासे, रामभाऊ कडलग, राम तांबे, साहेबराव बारवे, किसन वाळके, व्यवस्थापक अनिल थोरात आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार राज्यासाठी आदर्शवत पॅटर्न ठरला आहे. शेतकी संघ ही सहकारी संस्थांची मातृ संस्था आहे. काटकसर व पारदर्शकता यातून या संघाने राज्यात आपला लौकिक निर्माण केला आहे. शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकर्यांना कृषिपूरक व्यवसाय व साहित्यासाठी मोठी मदत केली जात आहे. राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले आहे. मात्र संगमनेरचा शेतकी संघ अशा अडचणीच्या काळात दिमाखात उभा आहे. केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. मात्र शेतकी संघ व सहकाराच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत करण्याचे काम सातत्याने संगमनेर तालुक्यात होत असल्याचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.
शेतकी संघाच्या वाटचालीत जुन्या पिढीतील नेत्यांनी मोठे योगदान दिले आहे. ही संस्था सर्व सहकारी संस्थांची मातृसंस्था असून कारखान्याचे भाग गोळा करण्याचे काम शेतकी संघाच्या कार्यालयामधून झाले आहे. काटकसर हे शेतकी संघाचे वैशिष्ट्य राहिले असून आगामी काळामध्ये शेतकी संघाने सीएनजी गॅस, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुविधेसाठी काम करण्यासाठी नवीन धोरण राबवणे गरजेचे असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
बापूसाहेब गिरी, बाळासाहेब उंबरकर, विलास कवडे, राजेंद्र गुंजाळ, साहेबराव गडाख, चंद्रकांत कडलग, भारत मुंगसे, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, सुहास आहेर, रेवजी घुले, बाळासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते. सभेचे नोटीस वाचन व्यवस्थापक अनिल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व बी. एन. काळे यांनी केले तर किसन वाळके यांनी आभार मानले.