गणेशोत्सवात गोरगरीबांना मदत करण्याबाबत पुढाकार घ्या ः थोरात संगमनेरातील यशोधन कार्यालय समोर एकविरा मार्केटचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संकटानंतर ठप्प झालेले जनजीवन हळूहळू रुळावर येत आहे. मात्र प्रत्येकाने अजूनही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या संकटातून सावरत असलेल्या गोरगरीब महिलांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत एकविरा फाउंडेशनने दिशादर्शक काम केले असून गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने गोरगरिबांना मदत होईल यासाठी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेरातील यशोधन कार्यालय समोरील जागेत एकविरा फाउंडेशनच्यावतीने बचत गट व महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठीच्या एकविरा मार्केटचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयू देशमुख, कर्करोग तज्ज्ञ डॉ.हसमुख जैन, डॉ.जयश्री थोरात, दीक्षा दिड्डे, अ‍ॅड.सुहास आहेर, अमित पंडित, निर्मला गुंजाळ, आर.एम.कातोरे, संपत डोंगरे, निखील पापडेजा, विवेक कासार, किरण काळे, सुनंदा दिघे, सुनंदा जोर्वेकर, वंदना गुंजाळ, तात्याराम कुटे, सुरेश झावरे, प्रा.बाबा खरात, नानासाहेब दिघे, डॉ.बाईसा गुंजाळ, सौदामिनी कान्होरे, मधुकर गुंजाळ, किशोर टोकसे, नितीन अभंग, राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.

येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी येऊन ठेपले आहेत. सणांमध्ये आपल्या स्वकीयांबरोबर आनंद साजरा करताना आपल्या आजूबाजूला गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे प्रत्येकाने काम करावे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. एकविरा फाऊंडेशनने मागील तीन वर्षांमध्ये गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलन, महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, हिमोग्लोबिन तपासणी, आदिवासी महिलांसाठी काम, शालेय शिक्षण विभागात मदत, कोरोना संकटात मदत अशा विविध ठिकाणी लोकाभिमुख उपक्रम राबविले आहे. प्रदूषण विरहित गणेश उत्सव व्हावा यासाठी एकविरा फाउंडेशनच्यावतीने यावर्षी यशोधन संपर्क कार्यालयासमोरील प्रांगणात एकविरा मार्केटचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.जयश्री थोरात यांनी सांगितले.

यावेळी डॉ.बायसा गुंजाळ, प्रा.वृषाली साबळे, ज्योती थोरात, शिल्पा गुंजाळ, ऐश्वर्या वाकचौरे, आदिश्री झंवर, प्राजक्ता मैड, अहिल्या ओहोळ, डॉ.सुरभी आसोपा, श्रद्धा कढणे, आदिती खोजे, पूजा गाडेकर, सई तुपे, प्राजक्ता घुले, शिवानी वाघ, पूजा थोरात, मयुरी थोरात, मिताली भडांगे, ईशिता मेहता आदी उपस्थित होत्या.

लिबर्टी अर्थवेअर आर्टने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती या एकविरा मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्या स्टॉलला डॉ.जयश्री थोरात यांनी आवर्जुन भेट दिली असता सदाशिव मुळे यांच्यासह लिबर्टीच्या अधिकार्‍यांनी त्यांना माहिती दिली.

Visits: 16 Today: 1 Total: 118653

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *