जयकिसान पतसंस्थेकडून मयताच्या वारसास धनादेश
जयकिसान पतसंस्थेकडून मयताच्या वारसास धनादेश
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील जयकिसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या मयत झालेल्या रामनाथ भागा वाळुंज या कर्जदाराच्या वारसास दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीकडून सहा लाख रूपयांचा धनादेश नुकताच वारसास प्रदान करण्यात आला आहे.
पठारभागातील घारगाव येथे जयकिसान पतसंस्थेची शाखा असून संस्थेचे चेअरमन किशोर डोके, व्हाईस चेअरमन नारायण भागवत यांनी संस्थेचे सभासद, कर्जदार व इतर सर्व कर्जदारांचा अपघाती विमा विमा प्रतिनिधी अजित आहेर यांच्याकडे काढला होता. काही महिन्यांपूर्वीच गुंजाळवाडी पठार येथील संस्थेचे सभासद रामनाथ भागा वाळुंज हे शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्याच दरम्यान सर्पदंश होवून त्यांचा मृत्यू झाला होता. नुकताच त्यांच्या वारसांना दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक दिलीप आगरकर, संगमनेर शाखेचे व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक व्यवस्थापक खलील शेख, चेअरमन किशोर डोके, व्हाईस चेअरमन नारायण भागवत, विमा प्रतिनिधी अजित आहेर आदिंच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे संचालक दत्ताभाऊ गाडेकर, बाबाजी मोरे, नानाभाऊ बोंबले, तान्हाजी गाडेकर, राजेंद्र डोके, दत्तात्रय लेंडे, वाल्मिक आहेर, दत्तात्रय कान्होरे, भाऊसाहेब गाडेकर, व्यवस्थापक सोपान हांडे, कर्मचारी संजय डोके, भाऊसाहेब भागवत आदी उपस्थित होते.
जयकिसान पतसंस्थेने नेहमीच कर्जदार आणि सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. या अनुषंगानेच सर्व कर्जदार आणि सभासदांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढला जातो. त्यामुळे मयत वारसांना मोठा दिलासा मिळत असून आर्थिक मदत होते.
– किशोर डोके (चेअरमन, जय किसान पतसंस्था)