… अखेर सावरगाव घुले येथील शेतकर्‍याचे उपोषण मागे!


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले येथील जालिंदर मुरलीधर घुले हे शेतकरी वारंवार वीज जोडणीची मागणी करुनही मिळत नसल्याने आपल्या कुटुंबासह सोमवारी (ता.20) ग्रामपंचायत प्रांगणात उपोषणास बसले होते. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी मध्यस्थी करत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन भांगरे आणि सहाय्यक अभियंता निखील शेलार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले.

पाच वर्षा शेतकरी जालिंदर घुले यांनी कृषी पंपांना वीज जोडणीची मागणी केली होती. पाच वर्षे उलटून देखील वीज जोडणी मिळाली नाही. तसेच घरगुती वीज जोडणी देखील मागणी मिळाली नाही. या निषेधार्थ त्यांनी आपल्या परिवारासह सावरगाव घुले येथील ग्रामपंचायतसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भांगरे आणि सहाय्यक अभियंता शेलार यांनी दखल घेतली असून जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे यांनी मध्यस्थी करत उपोषण सोडले. जोपर्यंत कार्यकारी अभियंता उपोषणस्थळी येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते जालिंदर घुले यांनी घेतली होती. अखेर लेखी अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन थांबविले. यावेळी सरपंच राजू खरात, उपसरपंच नामदेव घुले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घुले, सोसायटीचे चेअरमन नानू घुले, सामाजिक कार्यकर्ते किरण घुले, जिजाबा घुले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 174 Today: 1 Total: 2125422

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *