अकोलेत एलसीबीची कारवाई! सोळा जुगा-यांकडून पाच लाखाचे साहित्य जप्त

नायक वृत्तसेवा, अकोले
शहरात सुरू असलेल्या बिंगो ऑनलाईन जुगारावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापा टाकत १६ आरोपींकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. यामुळे अवैध धंदेचालकात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढूृन त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहे. त्यानुसार एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, आकाश काळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन कारवाईस रवाना केले. दरम्यान, सोमवारी हे पथक अकोले शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना बसस्थानकासमोरील नवले कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यामध्ये काही लोक ऑनलाईन बिंगो, मटका व डॉलर नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती मिळाली.

सदर ठिकाणी पथकाने छापा टाकला असता नितीन निवृत्ती गायकवाड (वय ३०), अमोल मारुती मोहिते (वय २५, दोघेही रा. इंदिरानगर, अकोले), वैभव राजेंद्र गायकवाड (वय २५, रा. कुंभारवाडा, अकोले), व्हेल्सी गफुर वाधिलो (वय ३०; रा. शाहुनगर, अकोले), अक्षय बाबासाहेब सकट (वय २४, रा. शिवाजीनगर, अकोले), गोपी भाऊराव आवारी (वय २६, रा. धामणगाव ता. अकोले), अरबाज मोहम्मद शेख (वय २५, रा. शिवाजी चौक, अकोले), आकाश संजय परदेशी (वय ३२, रा. कुंभारवाडा, अकोले), रमेश एकनाथ फापाळे (वय ३०, रा. लिगदेव अकोले), अनिल बाळू पवार (वय ३५, रा. शाहनगर, अकोले), विकास दत्तात्रेय आंबरे (वय २९, रा. गणोंरे, अकोले), खंड़ू केरु सदगीर (वय २८, रा. खिरविरे, अकोले), शशीकांत मुरलीधर बेणके (वय ३०, रा. खिरविरे, अकोले), अशोक राजेंद्र जगताप (वय २५, रा. शिवाजी महाराज चौक, अकोले), गणेश हौसराव साबळे (रा. शनि मंदिराच्या पाठीमागे, अकोले (फरार)), अतुल जालिदर नवले (रा. अगस्ती आगार, अकोले (फरार)) हे मिळून आले. त्यांच्याकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. आकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Visits: 82 Today: 1 Total: 1098757
