विसर्जनासाठी भंडारी मंगल कार्यालयात होणार गणेश मूर्त्यांचे संकलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संकट सुरू असल्याने राज्य सरकारकडून गणेशोत्सवार अनेक निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या उदात्त हेतूने युवा महेश व संगमनेर तालुका माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने रविवारी (ता.19) अनंत चतुर्दशीला (गणेश विसर्जन) शहरातील भंडारी मंगल कार्यालय अशोक चौक येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गणेश मूर्त्यांचे संकलन होणार आहे. त्यामुळे भाविकांनी येथे गणेश मूर्त्या आणून द्याव्यात, असे आवाहन केले आहे.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. परंतु, कोविड संकटामुळे निर्बंध आलेले आहेत. तसेच पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आणि अनुचित घटना टाळण्यासाठी एकाच ठिकाणी गणेश मूर्त्यांचे संकलन व्हावे म्हणून युवा महेश व संगमनेर तालुका माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने रविवारी (ता.19) अनंत चतुर्दशीला (गणेश विसर्जन) शहरातील भंडारी मंगल कार्यालय अशोक चौक येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. संकलित मूर्त्यांचे प्रवरा नदीत विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या गणेश मूर्त्या येथे आणून द्याव्यात असे आवाहन युवा महेशचे अध्यक्ष आनंद मणियार, सचिव भारतभूषण नावंदर, उपाध्यक्ष राजेश लाहोटी, खजिनदार योगेश झंवर, सहसचिव विनय तापडिया, सहखजिनदार कुशावर्त कासट, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, उपाध्यक्ष सचिन मणियार, सचिव राजकुमार लाहोटी, कोषाध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सहसचिव जुगल बाहेती, संघटन मंत्री संजय रा. मालपाणी आदिंनी केले आहे.