फ्लॉवर चोरण्यास आलेल्या कुकला लोकांनी पकडले

फ्लॉवर चोरण्यास आलेल्या कुकला लोकांनी पकडले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाघापूर शिवाराजवळील देवगाव रस्ता येथे शेतातील फ्लॉवर चोरण्यासाठी आलेल्या व्यक्तीला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर घटना 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर याकाळात घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विशाल कुमार केशी (वय 35, मूळ रा.नेपाळ, हल्ली रा.घारगाव, ता.संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी हा घारगाव परिसरात एका हॉटेलमध्ये कुक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या आरोपीला गुरुवारी (ता.3) जामीन मिळाला आहे.


संगमनेर तालुक्यातील वाघापूर शिवारातील देवगाव रस्त्यालगत दिलीप नारायण शिंदे, सोमनाथ शिंदे यांची शेती आहे. शिंदे यांच्या शेतीतून 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात आरोपी विशाल केशी याने फ्लॉवर चोरून नेले. 2 सप्टेंबरला चोरी करत असताना विशाल केशी हा शिंदे यांच्या ताब्यात सापडला. त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर दिलीप शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विशाल कुमार केशी याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय पवार हे करीत आहेत.

Visits: 120 Today: 3 Total: 1591999

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *