राहुरीत पुजारी महिलेची सोन्याची पोत लांबविली

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात पुन्हा चोर्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. शुक्लेश्वर मंदिरातील पुजारी महिलेला दोघा भामट्यांनी गंडा घालत दीड तोळ्याची सोन्याची पोत हालचलाखीने लांबविल्याची घटना बुधवारी (ता.20) घडली आहे. यामुळे शहरवासियांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

राहुरी शहरातील मध्यवस्तीत असणार्‍या शुक्लेश्वर मंदिरात पुरोहित कुटुंबीय पौराहित्य करतात. बुधवारी दोघे अज्ञात इसम मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने आले. त्यांनी धनश्री पुरोहित यांना पूजा करायची असे सांगितले. याचवेळी संधीचा फायदा उचलत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत हातचलाखीने लांबवली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. दरम्यान, या घटनेने शहरात पुन्हा चोर्‍यांचे सत्र चालू झाल्याचे अधोरेखित होऊन पोलिसांसमोर नवे आव्हान ठाकले आहे.

Visits: 112 Today: 1 Total: 1112112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *