अकोले तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलची कार्यकारिणी जाहीर

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओ. बी. सी. सेलची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. तालुकाध्यक्षपदी रामनाथ शिंदे, महिला तालुकाध्यक्षपदी उज्ज्वला राऊत व शहर सरचिटणीसपदी डॉ.रामहरी चौधरी यांची निवड झाली आहे.

याचबरोबर या कार्यकारिणीत विनायक शिंदे (उपाध्यक्ष बोटा गट), सोमनाथ वाकचौरे (उपाध्यक्ष धामणगाव गट), शरद मंडलिक (उपाध्यक्ष अकोले तालुका), बाळासाहेब बोर्‍हाडे (उपाध्यक्ष राजूर गट), संतोष फापाळे (उपाध्यक्ष कोतूळ गट), प्रशांत बंदावणे (तालुका सरचिटणीस), सचिन चौधरी (तालुका कार्याध्यक्ष), दत्ता बंदावणे (उपाध्यक्ष देवठाण गट), तुषार शिंदे (उपाध्यक्ष धामणगाव आवारी गट), सोन्याबापू चौधरी (खजिनदार) आणि महिला नयना पांडे (ओबीसी सरचिटणीस शहर), मंगल कर्णिक (ओबीसी तालुका चिटणीस) व सुरेखा जाधव (तालुका उपाध्यक्ष) आदिंची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांचे आमदार डॉ.किरण लहामटे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिला तालुकाध्यक्षा स्वाती शेणकर, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर व प्रशांत भालेराव आदिंनी अभिनंदन केले आहे.

Visits: 183 Today: 1 Total: 2127678

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *