संगमनेर शहर भाजपतर्फे आर्सेनिक गोळ्यांचे मोफत वाटप
संगमनेर शहर भाजपतर्फे आर्सेनिक गोळ्यांचे मोफत वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यासह शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. रोजची आकडेवारी पाहता संगमनेर शहर हे रेड झोन वर्गवारीत मोडत आहे. कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची यंत्रणा नेहमीच सज्ज राहिली आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी संगमनेर शहर भाजप तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत स्वखर्चाने ‘आर्सेनिक अल्बम 30’ या गोळ्यांचे शहरातील रेड झोन असलेल्या इंदिरानगर परिसरात मोफत वाटप करण्यात येवून जनजागृती करण्यात आली.
श्वसन संस्थेवरील आजारांसाठी होमिओपॅथी ‘आर्सेनिक अल्बम 30’ या औषधाचे परिणाम दिसत असल्याचे केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे म्हणणे आहे. मंत्रालयाच्या निर्देशानुसार सामाजिक संस्था, संघटनांकडून नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे. लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांचा जीव वाचविण्यासाठी मदत होणार आहे. ज्येष्ठ नेते राम जाजू, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, कल्पेश पोगुल, दिनेश सोमाणी, श्रीकांत कासट, भारत गवळी, दिलीप रावल, शिवकुमार भंगीरे, मुकूंद उपरे, सुमित राऊत, जग्गू शिंदे आदी भाजप कार्यकर्त्यांनी गोळ्या वाटपासाठी परिश्रम घेतले.