पांडुरंग गुंड ‘आदर्श उपसरपंच पुरस्कारा’ने सन्मानित

संगमनेर/प्रतिनिधी
तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपाचे माजी उपसरपंच पांडुरंग गुंड यांना नुकतेच श्रीरामपूर येथील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श उपसरपंच पुरस्कारा’ने गौरविले. याबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पिंपळगाव देपाचे उपसरपंच असताना पांडुरंग गुंड यांनी गावात जलयुक्त शिवार, पानी फाऊंडेशनी कामे, लाभाच्या योजना, कोविड काळात गरजूंना मदत, 100 टक्के हागणदारी मुक्त गाव, घरकुल योजना आदी कामे नेटाने केली. याच कार्याची दखल घेऊन श्रीरामपूर येथील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांना ‘आदर्श उपसरपंच पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडीत विद्यासागर होते. तर आमदार लहू कानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.शिरीष लांडगे, डॉ.बाबुराव उपाध्ये, डॉ.वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते. याबद्दल गुंड यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
