संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा पुन्हा उद्रेक! चार दिवसांतच साडेसातशे रुग्ण; चढाला लागलेली सरासरी चिंताजनक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील सरासरी रुग्णगतीला ओहोटी लागलेली असतांना संगमनेर तालुक्यात आज पुन्हा एकदा कोविड संक्रमणाचा उद्रेक झाला आहे. आज संगमनेर तालुक्यात जिल्ह्यातील उच्चांकी रुग्ण समोर आले असून तालुक्यातील 84 गावे आणि वाड्यावस्त्यांना संक्रमणाची झळ बसली आहे. आजच्या अहवालातून शहरातील 26 जणांसह पठारावरील 23 गावांमधून 42 रुग्ण आढळले आहेत. अतिशय धक्कादायक पद्धतीने वाढत असलेल्या संक्रमणातून गेल्या चार दिवसांतच तालुक्यात सरासरी तब्बल 190 रुग्णांच्या गतीने 756 नवीन बाधितांची भर पडली आहे. आजच्या उच्चांकी रुग्णवाढीने तालुका आता 29 हजार 534 रुग्णसंख्येवर पोहोचला असून सक्रीय रुग्णांची संख्या तेराशेच्या पल्याड गेली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 133, खासगी प्रयोगशाळेचे 65 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून समोर आलेल्या 52 अहवालांमधून तालुक्यातील 250 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील 26 जणांचा समावेश असून तालुक्यातील कोविड शून्य झालेल्या गावांमध्येही आज रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संक्रमण ओसरत असल्याचे चित्र निर्माण होत असतांना संगमनेर तालुक्यातील धक्कादायक रुग्णवाढीने त्याला सुरुंग लागला आहे. कोविड नियमांची सर्रास पायमल्ली आणि प्रशासकीय यंत्रणेंचे कागदी घोडे यामुळे तालुका पुन्हा एकदा ‘कठोर निर्बंधांच्या’ दारात उभा राहीला असून जिल्ह्यातील सरासरी बिघडवण्यासही कारणीभूत ठरला आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील घोडेकर मळा येथील 22 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय इसम, रंगारगल्लीतील 47 वर्षीय महिला, मोमीनपूर्यातील 31 वर्षीय तरुण, दिल्ली नाका येथील 82 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 80 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 64 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 58, 56, 46 व 45 वर्षीय तिघा इसमांसह 58, 42, 40 व 34 वर्षीय महिला, 30 व 21 वर्षीय दोघा तरुणांसह 21 व 20 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय मुलगी व 14 वर्षीय मुलगा बाधित झाला आहे.
तालुक्यातील कालेवाडी येथील 10 वर्षीय मुलगा, अकलापूर येथील 49 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी, धांदरफळ खुर्द येथील 66 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 37 वर्षीय महिला, मिर्झापूर येथील 23 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 34 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, डिग्रस येथील 32 वर्षीय महिला, महालवाडी येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंदरमाळ येथील 27 वर्षीय महिला, माहुली येथील 56 वर्षीय इसम, जांबुत येथील 55 वर्षीय महिला, कोठे खुर्द येथील 80 वर्षीय महिला, नांदूर येथील 36 व 28 वर्षीय महिलांसह 25 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 वर्षीय इसम, 38 व 31 वर्षीय तरुण, 42, 36, 33 व 32 वर्षीय महिला, 20 व 21 वर्षीय तरुणी आणि 16 वर्षीय मुलगा,
वडझरी बु. येथील 80 वर्षीय दोन, 60, 55, 40 व 30 वर्षीय महिला, 47 व 45 वर्षीय इसमासह 36 व 25 वर्षीय तीन इसम, काकडवाडी येथील 48 वर्षीय इसम, दरेवाडीतील 60 व 40 वर्षीय महिलांसह 50 वर्षीय इसम व 17 वर्षीय मुलगा, मांडवे बु. येथील 30 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणीसह 15 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा, बिरेवाडीतील 43 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुण, रणखांब येथील 50 वर्षीय दोघा इसमांसह 45 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, पारेगाव बु. येथील 25 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी, लोहारे येथील 60 वर्षीय ज्येश्ठ नागरिक, मेंढवण येथील 45 व 24 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 29 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 70 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 46 वर्षीय महिला,
पेमगिरीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 68 व 40 वर्षीय महिला, 43 वर्षीय इसम, 30 व 21 वर्षीय तरुण, कुरण येथील 75 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 24 वर्षीय महिला, चिकणी येथील 60 वर्षीय महिला, चंदनापूरी येथील 50 वर्षीय महिला, भोजदरी येथील 37 वर्षीय तरुण, घारगाव येथील 57 वर्षीय इसमासह 16 वर्षीय मुलगा, वरवंडीतील 80 व 45 वर्षीय महिलांसह 21 वर्षीय तरुण, साकूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मेंगाळवाडीतील 33 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 60 37 वर्षीय महिला, समनापूर येथील 47 वर्षीय इसम, अंभोरे येथील 45 वर्षीय इसम, पोखरी हवेलीतील 42 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा, वाघापूर येथील 83 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 36 वर्षीय तरुण व 31 वर्षीय महिला,
निमगाव जाळीतील 38 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 57, 32 व 28 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 63 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षीय इसम, 35 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला, सायखिंडीतील 40 व 27 वर्षीय तरुणांसह 31 वर्षीय महिला, कोळवाडे येथील 55 वर्षीय महिला, निमोण येथील 47 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, खळी येथील 65 वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथील 33 व 30 वर्षीय तरुणांसह 33 वर्षीय महिला, खांबे येथील 40 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 35 व 32 वर्षीय तरुण, पानोडीतील 31 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 65 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, निमज येथील 65, 45 व 40 वर्षीय महिलांसह 35 वर्षीय दोघे व 32 वर्षीय तरुण, चिखलीतील 62, 38, 35 वर्षीय दोघी व 26 वर्षीय महिला, 40, 38, 24 व 19 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुणी, 16 व 13 वर्षीय मुले,
पिंपळगाव कोंझिरा येथील 16 वर्षीय मुलगी, वडगाव लांडगा येथील 40 वर्षीय तरुण, बोटा येथील 56 वर्षीय महिला, जाखुरी येथील 46 वर्षीय इसमासह 36 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण व 19 वर्षीय तरुणी, कनोलीतील 35 वर्षीय महिला, मालदाड येथील 60 व 24 वर्षीय महिलांसह 46 वर्षीय इसम, 40 व 33 वर्षीय तरुण, 12 वर्षीय मुलगा, पिंपळे येथील 46 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 53 वर्षीय इसमासह 47 व 30 वर्षीय महिला, 32 व 27 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 90, 50 वर्षीय दोघी व 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 55 वर्षीय महिला, रायते येथील 50 वर्षीय इमस, 40 वर्षीय महिला व 37 वर्षीय तरुण, देसावडे येथील 81 वर्षीय वयोवृद्धासह 35 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगा,
जांभुळवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पठारावरील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 17 वर्षीय मुलगा, चिंचोली गुरव येथील 21 वर्षीय तरुण, राजापूर येथील 36 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय मुलगा, आश्वी बु. येथील 24 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 55 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 60 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण व 10 वर्षीय मुलगी, सावरगाव घुले येथील 28 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 48 व 26 वर्षीय महिलांसह 45 वर्षीय इसम, 36, 33 व 30 वर्षीय दोन तरुण, ओझर बु. येथील 38 वर्षीय महिला, सांगवी येथील 34 वर्षीय तरुण, कर्हे येथील 16 वर्षीय मुलगी, मानोरी येथील 59 वर्षीय इसम व तळेगाव दिघे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय इसम, 65, 60 वर्षीय दोघी, 56, 55, 52, 50, 45, 40, 36, 25 व 23 वर्षीय महिला, 18 वर्षीय तिघे तरुण व 16 वर्षीय मुलाचा समावेश आहे. निमगाव येथील 34 वर्षीय तरुणाचे नाव दोनवेळा नोंदविले गेले असून अन्य तालुक्यातील चिकलठाणा येथील 50 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, कळस बु. येथील 27 वर्षीय महिला, नवलेवाडीतील 57 वर्षीय महिला व वसू जळगाव येथील 60 वर्षीय इसमाचाही बाधितांमध्ये समावेश आहे.