जनतानगरमध्ये पालिका व लायन्स क्लबच्यावतीने वृक्षारोपण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जनतानगर येथील नगरपरिषदेच्या शाळा परिसरात नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते तसेच लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा सुनीता पगडाल, पालिकेतील पक्षप्रतोद विश्वास मुर्तडक, नगरसेविका रुपाली औटी, लायन्स क्लबचे डॉ.सूचित गांधी, विलास क्षत्रिय, अमोल खटाटे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आदिंच्या उपस्थितीत नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हरीत संगमनेर शहर संकल्पनेंतर्गत, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहरात विविध भागात मियावाकी म्हणजेच कमीत कमी जागेत अधिकाधिक व घनदाट वृक्षारोपण करून हरीत पट्टे निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा तांबे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी, प्रमोद लांडे, अश्विन पुंड, अरविंद गुजर, सुदाम सातपुते, योगेश मुळे, राजेंद्र म्हस्के, सुनील गोर्डे आदी उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 116708

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *