जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज झाली घट! 78 टक्के अहवाल खासगी प्रयोगशाळेचे; पठारभागातील रुग्णसंख्याही खालावली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येचे एकामागून एक धक्के देणार्‍या संगमनेर तालुक्याला आज काहीसा दिलासा मिळाला असून शासकीय प्रयोगशाळेच्या अप्राप्त अहवालांनी एकूण रुग्णसंख्येत दिलासादायक घट आणली आहे. त्यामुळे गेल्या मोठ्या कालावधीपासून सलग मोठी रुग्णसंख्या समोर येणार्‍या तालुक्याच्या पठारभागातील रुग्णसंख्याही आज खालावली आहे. आज प्राप्त झालेल्या 130 संक्रमित अहवालांमध्ये शहरातील सोळा जणांसह पठारभागातील 26 आणि तालुक्याच्या अन्य ग्रामीणभागातील 88 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 29 हजार 290 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 129 वर पोहोचली आहे.


मागील महिन्याभरापासून पाच तालुके वगळता उर्वरीत संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने नियंत्रणात आली असून दररोजच्या सरासरीतही मोठी घट झाली आहे. मात्र त्याचवेळी संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व अकोले तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र सतत हलती असल्याने या तालुक्यांतील संकमण कायम राहण्यासोबतच जिल्ह्याची एकूण सरासरीही स्थिरावल्यासारखी स्थिती आहे. जिल्ह्यातील सर्वाधीक लोकसंख्येचा परिसर असलेल्या अहमदनगर महापालिका क्षेत्रातील सरासरी वेगही नगण्य अवस्थेत पोहोचलेला असतांना त्या पेक्षा निम्म्याहून कमी आणि विखुरलेल्या लोकसंख्येच्या तालुक्यांमध्ये एकसारखी होणारी रुग्णवाढ चिंताजनक आहे. आजच्या या चिंता कायम असून संगमनेरसह श्रीगोंदा पारनेर व अकोले तालुक्यातून सत्तरहून अधिक रुग्ण समोर आले आहेत.


आज शासकीय प्रयोगशाळेचे अवघे सात, खासगी प्रयोशाळेचे 101 व रॅपीड अँटीजेनच्या 22 अहवालांमधून समोर आलेल्या तालुक्यातील 130 रुग्णांमध्ये शहरातील मेनरोडवरील 37 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 53 वर्षीय इसम, मुळे गल्लीतील 51 वर्षीय इसम, शिवाजीनगर परिसरातील 45 वर्षीय इसमासह 31 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगी व 11 वर्षीय मुलगा व संगमनेर असा पत्ता असलेल्या 49 व 40 वर्षीय महिलांसह 42 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व चार वर्षीय मुलाचा त्यात समावेश आहे. याशिवाय तालुक्यातील तळेगाव दिघे येथील 27 वर्षीय महिला, आझमपूर येथील 62 वर्षीय महिला, कर्‍हे येथील 82 वर्षीय वयोवृद्धासह 77, 42, 37 व 26 वर्षीय महिला, 16 व 14 वर्षीय मुले,


पिंपळगाव माथा येथील 56 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 47 वर्षीय इसमासह 38 व 35 वर्षीय तरुण, चिखली येथील 57 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय तरुण, कोकणगाव येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, म्हसवंडी येथील 22 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 41 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला, 46 वर्षीय इसम व 36 वर्षीय तरुण, बोटा येथील 81 वर्षीय वयोवृद्धासह 43 वर्षीय इसम, आंबी दुमाला येथील 48 वर्षीय महिला, मांडवे खुर्द येथील 78 व 42 वर्षीय महिलेसह 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 40 व 35 वर्षीय तरुण व 10 वर्षीय मुलगा, चणेगाव येथील 59 वर्षीय महिलेसह 19 व 18 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय तरुण,


कनोली येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय इसम, 45 व 23 वर्षीय महिला व 41 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 44 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुणी, पिंपळे येथील 27 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 36 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, कोळवाडे येथील 47 वर्षीय इसम, जवळे कडलग येथील 59 वर्षीय महिलेसह 31 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 61 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, निमोण येथील 55 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 55 वर्षीय इसम, मिर्झापूर येथील 34 वर्षीय तरुण, नांदूर येथील 20 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 46 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुणी, एठेवाडीतील 55 वर्षीय महिला 55 वर्षीय महिला, हिवरगाव पठारावरील 27 वर्षीय तरुण,


शेळकेवाडीतील 40 वर्षीय महिला, जांबुत येथील 11 वर्षीय मुलगी, ओझर खुर्द येथील 60 व 45 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम, 12 व पाच वर्षीय मुली व नऊ वर्षीय मुलगा, मांची येथील 40 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगा, उंबरी बाळापूर येथील 55 वर्षीय इसम, खंदरमाळ येथील 42 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 20 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 42 वर्षीय तरुणासह 36 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 51 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, वडगावपान येथील 35 व 27 वर्षीय तरुण, भागवतवाडीतील 50 वर्षीय इसम, पलसपूर येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, धांदरफळ येथील 42 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 80 वर्षीय महिला, कनकापूर येथील 65 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 18 वर्षीय तरुण,


रहिमपूर येथील 32 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35, 32 व 22 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय तरुणी, अकलापूर येथील 40 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 18 वर्षीय तरुणी, पेमगिरीतील 72 वर्षीय महिला, 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 48 वर्षीय इसम, कौठे मलकापूर येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 68, 36 व 30 वर्षीय महिला, 44 वर्षीय इसम व 12 वर्षीय मुलगा, सायखिंडीतील 44 वर्षीय इसम, शिबलापूर येथील 22 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा 33 वर्षीय तरुण, रायते येथील 39 वर्षीय तरुण, चिकणीतील 78 व 54 वर्षीय महिलांसह 58 वर्षीय इसम व 30 वर्षीय तरुण, राजापूर येथील 50 वर्षीय इसमासह 47 व 38 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण आणि ढोलेवाडीतील 60 वर्षीय महिला बाधित झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही आज झाली घट..
बुधवारी नऊशेपार गेलेली जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आज पूर्ववत सरासरीवर येवून स्थिरावल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 165, खासगी प्रयोगशाळेचे 328 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून समोर आलेल्या 253 अहवालांमधून जिल्ह्यातील 746 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर तालुक्यातून सर्वाधीक 130 रुग्णांसह श्रीगोंदा 89, पारनेर 84, अकोले 78, शेवगाव 47, नेवासा 46, नगर ग्रामीण व पाथर्डी प्रत्येकी 42, राहाता 39, राहुरी 33, जामखेड 27, अहमदनगर महापालिकत्त क्षेत्र 23, श्रीरामपूर 20, कर्जत 17, कोपरगाव 15, इतर जिल्ह्यातील 11, भिंगार लष्करी परिसरातील दोन व लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 25 हजार 880 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 13 हजार 562 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून 6 हजार 567 जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 751 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज जिल्ह्यातील 769 रुग्णांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर आता 96.22 टक्के आहे.

Visits: 242 Today: 2 Total: 1416110

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *